salman khan in ind vs pak today match for the promotion of tiger 3 movie  SAKAL
मनोरंजन

Ind Vs Pak: ना कोहली ना रोहीत, हा आहे सलमानचा फेव्हरेट खेळाडू, पाकिस्तानच्या मॅचवेळी केला खुलासा

भारत vs पाकिस्तान सामन्यात सलमान खान टायगर 3 चं प्रमोशन करण्यासाठी पोहोचला आहे

Devendra Jadhav

आज भारत पाकिस्तान मॅचचा थरार रंगत आहे. अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच सुरु आहे. या मॅचला अनेक भारतीय मनोरंजन विश्वातील अनेक तारे - तारका उपस्थित आहेत. शंकर महादेवन, सुखविंदर सिंग, अर्जित सिंग असे गायक सुद्धा या सामन्याची रंगत वाढवायला उपस्थित आहेत.

अशातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान भारत - पाकिस्तान मॅचसाठी स्टेडियमवर उपस्थित असलेला दिसतोय. मॅचच्या आधी स्टूडिओ मध्ये सलमानने खास गप्पा मारल्या.

(salman khan in ind vs pak today match for the promotion of tiger 3 movie)

सलमानचा फेव्हरेट खेळाडू कोण?

सलमान खान टायगर 3 चं प्रमोशन करण्यासाठी आज भारत पाकिस्तान मॅचदरम्यान स्टूडिओत उपस्थित होता. त्यावेळी सलमानने त्याचा आवडता खेळाडू कोण याचा खुलासा केलाय.

सलमान खानने विराट कोहली किंवा रोहित शर्माचं नाव न घेता एका वेगळंच नाव घेतलं. ते नाव म्हणजे के. एल. राहूल. कठीण प्रसंगात राहूल ते प्रेशर चांगल्या पद्धतीने हाताळतो. म्हणून सलमानचा आवडता खेळाडू के. एल. राहूल आहे.

सलमान खानने विराट कोहली - रोहितचं केलं कौतुक

सलमान खानला विचारले गेले की, त्याच्या सिनेमांमधले कोणते पात्र टीम इंडियाच्या खेळाडूंना तो डेडीकेट करु शकतो. विराट कोहलीबद्दल विचारले असता सलमान म्हणाला की, दबंगच्या चुलबुल पांडेची आयकॉनिक भूमिका कोहलीसाठी योग्य असेल, तर रोहित शर्मासाठी त्याला बजरंगी भाईजानच्या पवन चतुर्वेदीची भूमिका सर्वोत्कृष्ट वाटते.

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच सध्या रंजक वळणावर सुरु आहे. भारताने पाकिस्तानचे तीन विकेट घेतले आहेत. नुकतंच पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझन ५८ चेंडूत ५० धावा करुन क्लीन बोल्ड झाला. गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याची विकेट घेतली. आतापर्यंत ३० षटकांचा खेळ पूर्ण झाला असून पाकिस्तान ३ विकेट देऊन १५८ धावांवर खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT