Shah Rukh Khan
Shah Rukh Khan  esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : 'तसं असतं तर शाहरुखलाही मारलं असतं!' लॉरेन्सचं खळबळजनक वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

Lawrence Bishnoi On Sidhu Moosewala Murder Case : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईनं सध्या जे काही धक्कादायक खुलासे केले आहेत त्यावरुन तो चर्चेत आला आहे. काल त्यानं एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्यानं आणखी एक वक्तव्य केलं होतं.

लॉरेन्स बिष्णोईच्या त्या मुलाखतीनं मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडवून दिली होती. सलमान खानला काही वर्षांपूर्वी काळवीट हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर राजस्थान कोर्टात त्याप्रकरणाची सुनावणीही झाली होती. यासगळ्यात सलमान खाननं बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्याचे लॉरेन्सनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यानं समाजाची माफी मागावी.एवढीच आपली इच्छा असल्याचे लॉरेन्सचे म्हणणे होते.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

यासगळ्यात ल़ॉरेन्सनं म्हटलं होतं की, सलमान जे वागला ते चूकीचे होते. मी त्यावेळी अवघ्या चार ते पाच वर्षांचा होतो. त्या कृत्याविषयी समाजामध्ये आजही बोलले जाते. सलमाननं आमच्या समाजाला नेहमीच अपमानित केले आहे. त्यानं माफी मागावी. आम्ही काय म्हणणार नाही. पण तो जर ऐकत नसतील तर त्यानं यापुढील काळात काय होईल हे सांगू शकत नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करु. अशी जाहीर धमकीही लॉरेन्सनं दिली होती.

लॉरेन्सनं बोलताना किंग खान शाहरुखचे देखील नाव घेतले. तो म्हणाला. जे चुकीचे वागले त्याविषयी मी बोलतो आहे. आमचा राग सलमानवर आहे. तो चुकीचा वागला आहे. त्याचा गर्व आम्हाला मोडून काढायचा आहे. त्याची चूक आहे म्हणून तर त्याच्यावर राग आहे. आम्ही हे काय प्रसिद्धीसाठी करत नाही. तसं असतं कर मग शाहरुखलाही मारलं असतं. एवढचं काय जुहू चौपाटीवरील कुणालाही मारलं असतं. अशी प्रतिक्रिया लॉरेन्सनं दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT