salman khan makeup artist paleshwar chavan beaten up in Mumbai, what is the real case?  eSakal
मनोरंजन

Salman Khan: सलमान खानच्या मेकअप आर्टिस्टला मुंबईत जबर मारहाण, नेमकं प्रकरण काय?

मेकअप आर्टिस्ट पालेश्वर चव्हाण यांच्यावर मुंबईतील एका बारबाहेर हल्ला करण्यात आला.

Devendra Jadhav

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणारा मेकअप आर्टिस्ट पालेश्वर चव्हाणवर मुंबईतील एका बारबाहेर हल्ला करण्यात आला.

पालेश्वरने एकदा एका मॅनेजरला काही पैसे दिले होते, मात्र त्याने पैसे परत मागितले असता मॅनेजरने त्याला मारहाण केली. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्यावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने पालेश्वरला रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

(salman khan makeup artist paleshwar chavan beaten up in Mumbai)

मेकअप आर्टिस्ट पालेश्वरने बार मॅनेजर सतीशला काही पैसे उधार दिले होते. पहिल्यांदा दिलेले पैसे पालेश्वरला परत मिळाले. त्यानंतर विश्वास ठेऊन पालेश्वरने पुन्हा त्याला तीन लाख रुपये दिले.

जेव्हा पालेश्वर तीन लाख मागायला गेला तेव्हा सतीशने कारणं सांगितली. पुढे पैसे मागण्यासाठी पालेश्वर सांताक्रूझमधील पुष्पक बारमध्ये रात्री १० वाजता पोहोचला. सतीशने आधी त्याला दोन-तीन तास वाट पहायला लावली. त्यानंतर बार बंद आहे नंतर ये, असं त्याला सांगितले.

पालेश्वर तिथून गेला नाही. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास सतीश आणि पालेश्वर यांच्यात जोरदार वाद झाला. प्रकरण इतके वाढले की मॅनेजरने वेटरला आणि त्याच्या मित्रांना बोलावले. त्या मित्रांनी लोखंडी रॉड, विटा आणि दगड घेऊन पालेश्वरवर हल्ला केला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पालेश्वरची प्रकृती चिंताजनक झाल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पालेश्वरने बार व्यवस्थापकासह सर्व आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. बार मॅनेजर सतीश हा त्याचा मित्र असल्याचे पालेश्वरने पोलिसांना सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facial Recognition: चेहरा स्कॅन, रिपोर्ट सेकंदात! स्टेशनमध्ये गुन्हेगार शिरताच पकडले जातील; पोलिसांची नवी सिस्टम अॅक्शनमध्ये

Meta ची मोठी कारवाई! १६ वर्षांखालील मुलांचं इंस्टाग्राम-फेसबुक अकाउंट्स १० डिसेंबरपर्यंत कायमची डिलीट होणार, हे आहे कारण

Kalyan crime : हिंदी बोलल्याने मराठी तरुणाला लोकलमध्ये मराठी लोकांची मारहाण, मानसिक तणावातून संपवले जीवन

Maharashtra Leopard : मानव-बिबट संघर्षावर उपाय; नसबंदीसाठी राज्य सरकारचा हिरवा झेंडा!

Tejashwi Yadav Reaction on Nitish Kumar Oath : नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT