salman khan meet mirabai chanu share photo get trolled 
मनोरंजन

सलमानने घेतली मीराबाई चानूची भेट; गळ्यातील स्कार्फमुळे झाला ट्रोल

स्कार्फवरील प्रिंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

प्रियांका कुलकर्णी

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानू (mirabai chanu) हिने रौप्यपदक पटकावलं. 49 किलो वजनी गटात तिने ही कामगिरी केली. सोशल मीडियावर अनेकांनी मीराबाईला शुभेच्छा देत पोस्ट शेअर केल्या आहे. नुकतीच मीराबाईने अभिनेता सलमान खानची (salman khan) भेट घेतली. सलमानने मीराबाईच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला सलमानने कॅप्शन दिले, 'मीराबाई चानू सिल्वर मेडलिस्ट, तुमच्यासाठी मी खूप खूश आहे. माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतील.' सलमानने शेअर केलेला फोटो रिपोस्ट करत मीराबाईने लिहिले, 'सलमान सर तुमचे आभार, मी तुमची चाहती आहे. माझं तुम्हाला भेटण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं.' या फोटोमधील सलमानच्या स्कार्फवरील हरणाच्या प्रिंटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.

सलमानने शेअर केलेल्या मीराबाईंसोबतच्या फोटोमधील स्कार्फमुळे अनेकजण त्यांला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, ' भाईच्या स्कार्फवर हरिण'. दुसऱ्याने लिहीले, 'हिरण डेव्हिल के पिछे और डेव्हिल हिरण के पिछे…टू मच फन'

मीराबाईने ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकल्यानंतर सलमानने तिचं अभिनंदन करत एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये सलमानने लिहिले होते, 'देशाची सुपरस्टार बनल्याबद्दल मीराबाई चानूचं खूप खूप अभिनंदन. आम्हाला तुझ्यावर अभिमान आहे. खऱ्या अर्थाने तू दबंग आहेस.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT