Salman Khan  Google
मनोरंजन

सलमान खानला 'suicide disease'? स्वतः सांगितली वेदनेची कहाणी

सलमान खानने २००१ मध्ये मज्जातंतूच्या विकारानं त्रस्त झाल्यावर अमेरिकेत जाऊन उपचार घेतले होते.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान(Salman Khan) किती फिटनेस प्रेमी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. वयाची ५५ वर्ष उलटल्यानंतरही त्यानं ज्या प्रकारे स्वतःला फीट ठेवलंय किंवा ज्या पद्धतीचा तो वर्क आऊट करतो ते सगळ्यांनाच प्रोत्साहन देणार आहे. अभिनयापेक्षा त्याची पिळदार शरीरयष्टी आणि रुबाबदार दिसणं त्याच्या सिनेमांना बॉक्सऑफिसवर यश देऊन गेलंय. अर्थात प्रेक्षकांच्या मनातही त्यानं याच कारणानं घर केलेलं आहे. पण असा अंगकाठीनं मजबूत,दणकट असणारा सलमान एकेकाळी मंज्जातंतू विकाराचा सामना करत होता. त्याला Suicide Disease झाला होता हे माहित आहे का? हो,हे खरं आहे. 'ट्युबलाईट' या त्याच्या गाण्याच्या लॉंच कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यानं आपल्या या आजाराविषयी खुलासा केला होता. या आजाराच्या वेदना आणि त्यावरील उपचारांच्या वेदनादायक प्रवासाविषयी सांगताना त्यानं काही खुलासे केले होते. या आजारावर आपण अमेरिकेत जाऊन उपचार घेतल्याचं त्यानं सांगितलं होतं.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत तो म्हणाला आहे,'' मी ज्या मज्जातंतूच्या विकाराचा सामना करत होतो त्याला Trigeminal Neuralgia असे म्हणतात. त्यामुळे मी बोलू शकत नव्हतो. बोलताना माझं तोंड अचानक हळूहळू बंद व्हायचं. आणि खूप वेदना त्यावेळी जाणवायच्या. ती वेदना एका क्षणी इतकी असह्य होते की अनेक रुग्णांना वाटतं की आपण त्याक्षणी आत्महत्या करावी''. सलमाननं २००१ मध्ये आपल्या त्या विचित्र आजाराविषयी सांगितले होते. तो म्हणाला होता,''माझ्या आवाज मध्येच कापतो किंवा कर्कश्य वाटतो त्यामागे मी मद्यपान करतो हे कारण नाही तर माझ्या या विचित्र आजाराचा तो आवाजावर झालेला परिणाम आहे. मी रमझानच्या वेळेत मद्यपान करत नाही. पण तरिही या आजारामुळे माझा आवाज तसा कापतो,विचित्र कर्कश्यपणा त्यात जाणवतो की लोक शंका घेऊ लागतात. त्यामुळे आता मला फक्त माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे''.

सलमान खान आता लवकरत बहुचर्चित 'टायगर 3' सिनेमातून आपल्या भेटीस येत आहे. कतरिना कैफ आणि इमरान हाश्मि हे देखील या सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. तसंच 'kick 2' या सिनेमात सलमान जॅकलिनसोबत तर 'कभी ईद,कभी दिवाली' मध्ये पुजा हेगडेसोबत काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT