Salman Khan: Esakal
मनोरंजन

Salman Khan: 'तर तूझ्या मामूचंही ऐकू नको' भाचीच्या वाढदिवसाला सलमानचा मोलाचा सल्ला!

Vaishali Patil

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. त्याला बॉलिवूडमध्ये सर्वच भाईजान म्हणतात. त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. त्याने त्याच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तो त्याच्या बाल्ड लूकमुळे चर्चेत आला होता. मात्र आता तो त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सलमान एक उत्तम अभिनेता असल्याबरोबरच एक चांगला व्यक्ती देखील आहे. सलमान खान नात्यांना खूप महत्त्व देतो. त्याची बहीण अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मा यांच्या दोन्ही मुलांसोबत त्याचे खुप खास नाते आहे. त्याच्या भाच्यांसोबत तो नेहमी फोटो देखील शेयर करत असतो.

आता सलमानने त्यांची भाची अलिझेह अग्निहोत्री हिच्यासाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. यात तिच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत त्याने अलिझेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमान खान या पोस्टमध्ये लिहितो, "मामूवर एक उपकार कर. तू जे काही करशील ते पुर्ण मनापासून आणि मेहनतीने कर. नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात सरळ जा. फक्त स्वतःशीच स्पर्धा करं. फिट होण्यासाठी एकसारख होऊ नकोस अन् काहीतरी वेगळं करून सर्वांपासून वेगळी होऊ नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकदा तू वचन दिले की तर तुझ्या मामूचंही ऐकू नको. ते वचन पूर्ण कर".

सध्या सलमानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमानचे मित्र आणि चाहत्यांनी पोस्टच्या कमेंटमध्ये अलिझेह शुभेच्छा दिल्या आहेत. वकरच सलमानची भाची अलिझेह अग्निहोत्री ही चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहे.

अलिझेह अग्निहोत्री ही 22 वर्षाची आहे. ती बऱ्याचदा सलमान खानसोबत दिसली आहे. चित्रपट निर्माते सौमेंद्र पाधी यांच्या चित्रपटात अलिझेह अग्निहोत्री काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT