bollywood kisika bhai kisi ki jaan twitter review Esakal
मनोरंजन

Twitter Review: कसा वाटला मग पब्लिकला भाईजानचा kisi ka bhai kisi ki jaan... ट्विटर रिव्ह्यू म्हणताय, 'सिनेमा खुपच...'

Vaishali Patil

Kisi ka Bhai Kisi ki jaan Twitter Review: सलमान खानचा या वर्षातील बहूप्रतिक्षित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' हा आज म्हणजेच 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही ईदच्या एक दिवस आधी रिलीज झाला. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटांची खुपच प्रतिक्षा लागलेली होती.

चित्रपट रिलिज होण्याआधीच या चित्रपटाची अ‍ॅडव्हास बुकिंग फुल झाली होती असा दावा करण्यात येत होता. चित्रपट रिलीज होताच सलमानच्या चाहत्यांनी सगळीकडे थिएटर मध्ये गर्दी केली आणि जल्लोष सुरू केला आहे.

ट्विटरवर सकाळपासून चित्रपटाचे अनेक स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चाहते थिएटरमधूनच चित्रपटाची अपडेट्स देत आहेत. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे असं दिसत आहे. आता अनेकांनी ट्विटरवर या चित्रपटाचा रिव्ह्यू द्यायला सुरवात केली आहे.

ट्विटरवर मात्र या चित्रपटाबद्दल समिश्र प्रतिक्रिया देत आहे. एकीकडे चाहत्यांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे. पण चित्रपटाच्या पूर्वार्धाची चर्चा आहे आणि बहुतेक नेटकरी या चित्रपटाचा इंटरव्हल खुपच खराब असल्याच सांगत आहे.

सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानच्या ट्विटवरील प्रतिक्रिया पाहुया.

एकाने या चित्रपटाला निराशाजनक म्हणत फक्त साउथ चित्रपटाची कॉपी केली असल्याच म्हटलं आहे. तर दुसऱ्याने या चित्रपटाला डिझास्टर म्हटलं आहे.

त्याबरोबर काहींना या चित्रपटातील सलमानची कॉमेडी आणि अ‍ॅक्शन सीन्स खुप आवडले आहे. तर काहींना हा चित्रपट खुपच मनोरंजन करणारा वाटला आहे.

अशाप्रकारे या चित्रपटाला दोन टोकाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सलमान खान प्रॉडक्शनच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजीनं केलं आहे. सिनेमात सलमान खान,व्यंकटेश दग्गुबाती,पूजा हेगडे,जगपति बाबू,भूमिका चावला,विजेंदर सिंग,अभिमन्यु सिंग,राघव जुयाल,सिद्धार्थ निगम,जस्सी गिल,शहनाज गिल,पलक तिवारी आणि विनाली भटनागर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT