Annat Ambani and Radhika Merchant esakal
मनोरंजन

Annat Ambani and Radhika Merchant: आरारारा खतरनाक! अंबानींच्या कार्यक्रमात तीन खान एकत्र नाचले; व्हिडीओची सर्वत्र चर्चा

Annat Ambani and Radhika Merchant: प्री-वेडिंग फंक्शनमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी खास परफॉर्मन्स केला. त्यांच्या या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

priyanka kulkarni

Annat Ambani and Radhika Merchant: अनंत अंबानी (Annat Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स हे गेल्या दोन दिवसांपासून जामनगरमध्ये (Jamnagar) सुरु आहेत. जामनगरमध्ये 1 मार्च रोजी कॉकटेल पार्टी झाली आहे तर 2 मार्च रोजी विविध बॉलिवूडमधील कलाकारांनी प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केलं. अशताच या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांनी खास परफॉर्मन्स केला. त्यांच्या या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये शाहरुख, सलमान आणि आमिर यांनी नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला. यावेळी तिन्हीही खाननं त्यांच्या आयकॉन डान्स स्टेप्स केल्या. तिन्हीही खानच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांची 'नाटू नाटू' या गाण्यातील हुक स्टेप करण्याचा प्रयत्न शाहरुख, सलमान आणि आमिर करताना दिसत आहेत. पण नंतर सलमान त्याच्या 'जीने के है चार दिन' या गाण्याची हुक स्टेप करतो.

पाहा व्हिडीओ:

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दिलजीत दोसांजनं देखील गाणं गायलं तसेच या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, सैफ अली खान, जान्हवी कपूर, अजय देवगण, शाहरुख खान, आलिया भट्ट, करीना कपूर यांनी देखील हजेरी लावली.

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये प्रसिद्ध हॉलिवूड गायिका रिहानानं देखील परफॉर्म केलं.रिहानानं अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये परफॉर्म करायला तब्बल 52 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे, असं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT