salman khan And laapataa ladies  esakal
मनोरंजन

Salman Khan: 'लापता लेडिज' चा रिव्ह्यू शेअर करताना भाईजानकडून झाली 'ही' चूक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Salman Khan: सलमान खाननं (Salman Khan) देखील 'लापता लेडिज' या सिनेमाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा रिव्ह्यू शेअर करताना सलमान खानने एक चूक केली आहे.

priyanka kulkarni

Salman Khan: किरण रावचा (Kiran Rao) दिग्दर्शित 'लापता लेडिज' (Laapataa Ladies) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ते अनुराग कश्यपपर्यंत (Anurag Kashyap) अनेकांनी या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर करुन या सिनेमाचं कौतुक केलं. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं (Salman Khan) देखील 'लापता लेडिज' या सिनेमाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा रिव्ह्यू शेअर करताना सलमान खानने एक चूक केली, ज्यामुळे आता नेटकरी सलमानला खूप ट्रोल करत आहेत.

सलमान खाननं शेअर केला रिव्ह्यू

सलमान खाननं ट्विटरवर (X) 'लापता लेडिज' या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. यामध्ये त्यानं लिहिलं, "नुकताच किरण रावचा लापता लेडिज हा सिनेमा पाहिला. व्वा व्वा किरण! मी आणि माझ्या वडिलांनी हा सिनेमा खूप एन्जॉय केला. दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्याबद्दल किरणचं अभिनंदन, उत्तम काम केलं आहेस. तू माझ्यासोबत कधी काम करणार?"

भाईजाननं केली 'ही' चूक

सलमानने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'लापता लेडिज' या सिनेमाद्वारे किरणनं दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. पण किरणनं 2010 मध्ये धोबी घाट चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सलमाननं केलेल्या या चूकीमुळे आता नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सलमानचं ट्वीट व्हायरल झालं आहे. अनेकांनी सलमानच्या ट्वीटला रिप्लाय देऊन त्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "भावा, 14 वर्षांपूर्वी तू किरणनं दिग्दर्शित केलेल्या धोबीघाट या सिनेमाच्या प्रीमियरला उपस्थित होतास."

'लापता लेडिज' ची स्टार कास्ट

किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित 'लापता लेडिज' या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

सलमानचे चित्रपट

सलमानचे किसी का भाई किसी की जान आणि टायगर-3 हे चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाले. आता सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT