Salman Khan shared new photo he Flashes Million Dollar Smile, fans gone a mad sakal
मनोरंजन

Salman Khan: सलमान खाननं शेयर केला 'तो' फोटो अन् चाहत्यांनी जीव ओवाळून टाकला..

सोशल मीडियावर फक्त सलमानच्याच फोटोची हवा..

नीलेश अडसूळ

Salman Khan Photo : अभिनेता सलमान खान आता 'साठी' गाठत आला तरी त्याची हवा काही कमी झालेली नाही. अजूनही चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी वेडेपिसे होतात. त्यांच्या चाहत्यांनी त्याला दिलेली 'भाईजान' ही ओळखच त्यांचं प्रेम सांगून जाते.

अशाच बॉलीवूडच्या या भाईजाननं पुन्हा एकदा एपली जादू दाखवली आहे. भाईजान आपल्या कामातून वेळात वेळ काढत सोशल मिडियावर सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांना वेळ देत असतो. आज त्याने एक असा फोटो शेयर केला आहे की, पाहणारे फक्त बघतच राहिले आहेत.

(Salman Khan shared new photo he Flashes Million Dollar Smile, fans gone a mad)

 सलमान खान (Salman Khan) सध्या धमकीप्रकरणामुळे चर्चेत आहे. सलमानच्या सुरक्षेसह प्रत्येक हालचालीकडे सर्वांचे कटाक्षाने लक्ष आहे. चाहत्यांनाही त्यांच्या भाईजानची प्रचंड काळजी आहे. अशातच सलमानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत भाईजान खूपच आनंदी दिसत आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट, हातात ब्रेसलेट असा काहीसा सलमानचा लुक आहे. या फोटोत सलमान इतका गोड हसला आहे की, चाहते वेडे झाले आहेत. हा फोटोत शेअर करत दबंग खानने कॅप्शनमध्ये 'हाय' असं लिहिलं आहे.  

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहते भाईजानवर फिदा झाले आहेत. 'आम्ही तुझ्या लग्नाची आम्ही वाट बघतोय..', 'बॉलिवूडची शान भाईजान', 'आज तू खूपच हॉट दिसत आहेस', 'आय लव्ह यू सलमान' अशा कमेंट्स चाहत्यांनी या फोटोवर केल्या आहेत.

सलमान खानला काही दिवसांपूर्वी ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी जोरदार कारवाई करत राम बिश्नोई या आरोपीला अटक केली. पण नंतर यूकेमध्ये लपून बसलेल्या गोल्डी ब्रारने तो ई-मेल पाठवला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. धमकीप्रकरणानंतर सलमान खान पहिल्यांदाच काल 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन कार्यक्रमात दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT