salman khan 
मनोरंजन

लिलावती रुग्णालयात सलमान; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खानला बुधवारी दुपारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी त्याला पाहिलं आणि त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. सलमान रुग्णालयात का गेला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला असून अनेकांनी त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. सलमानला नेमकं काय झालंय, असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला. पण तो नेमकं कोणत्या कारणासाठी रुग्णालयात गेला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

सलमानने काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस'चं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर त्याच्या 'राधे' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. सलमान कोरोना प्रतिबंधक लशीसाठी रुग्णालयात गेला की काय, असाही अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे, हे सलमानकडून स्पष्ट होईल. 

आमिर खानला कोरोना
अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली असून तो सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन त्याच्या प्रवक्त्यांनी केलं. आमिरने दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT