Salman Khan
Salman Khan 
मनोरंजन

सलमान खानने त्याच्या हटके स्टाईलमध्ये दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- आज देश ७४ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अमिताभ बच्चन, कंगना रनौट, अनुपम खेर सोबत अनेक बॉलीवूड कलाकारांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सलमान खानने देखील भारतीयांना एका खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

स्वातंत्र्य दिवस विशेष: देशभक्तीचे हे जबरदस्त डायलॉग्स ऐकून अंगावर येतील शहारे 

सलमान खानचा अंदाज इतर कलाकारांपेक्षा यावेळी देखील वेगळा ठरला आहे. १५ ऑगस्टच्या या खास दिवशी सलमान खानचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो देशभक्तीपर गाणं गातोय. सलमानने 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तां हमारा' हे गाणं गाऊन भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ सलमानचे जीजाजी अतुल अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मिडियावरु शेअर केला आहे. सोशल मिडियावर सलमान खानच्या या व्हिडिओला खूप रिऍक्शन मिळत आहेत. काही तासांतच हजारो लोकांनी रिऍक्शन दिल्या आहेत.

सलमान काही दिवसांपूर्वी पनवेल येथील फार्महाऊसवर होता. तिथे तो दररोज काही ना काही काम करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत होता. सलमान शेतात ट्रॅक्टर चालवताना, भाताची लावणी करताना दिसून आला होता. फार्महाऊसवर असताना देखील सलमानने त्याचे काही व्हिडिओ रिलीज केले होते. 'तेरे बिना' या गाण्यात सलमान-जॅकलीन एकत्र दिसले होते. सलमानने त्याच्या फार्महाऊसवरंच हा व्हिडिओ शूट केला होता.

याशिवाय सलमान बिग बॉसच्या आगामी सिझनमुळे देखील चर्चेत आहे. लवकरंच बिग बॉस टेलिकास्ट होणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉसचा टिजर देखील काही दिवसांपूर्वीस प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आला होता. यामध्ये सलमान फार्महाऊसवर जी कामं करत होता त्याचेच व्हिडिओ दिसून आले. यावेळी असं देखील म्हटलं जातंय की बिग बॉस १४ न म्हणता बिग बॉस २०२० असा उल्लेख केला जाणार आहे.

salman khan sung saare jahan se achcha on the occasion of independence day  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT