Salman Khan's swollen eyes at Karan Deol's reception worries fans viral video sakal
मनोरंजन

Salman Khan: सुजलेले लाल डोळे आणि उतरलेला चेहरा.. सलमानची अवस्था पाहून चाहते चिंतेत; व्हिडिओ व्हायरल

सलमानचा हा व्हिडिओ कालपासून भलताच व्हायरल होत आहे.

नीलेश अडसूळ

Salman khan in Karan Deol Wedding: सनी देओलचा लाडका लेक करण देओलच्या लग्नाची धामधूम आपण सर्वांनीच पाहिली. गेली काही दिवस बॉलीवुडमध्ये याच लग्नाची चर्चा होती. या निमित्ताने आपल्याला संपूर्ण देओल कुटुंब एकत्र आल्याचे दिसले.

हे लग्न जितके दिमाखात झाले तितकेच या लग्नाचे रिसेप्शन ही जोरदार झाले. या रिसेप्शनला जवळपास अवघं बॉलीवुड लोटलं होतं. अगदी नवोदित कलाकारांपासून ते ज्येष्ठ कलाकारही या रिसेप्शनला आवर्जून उपस्थिती होते.

पण यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अभिनेता सलमान खानने. सलमान रिसेप्शनला आला खरा पण त्याचा अवतार पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यावेळी सलमानची असलेली अवस्था पाहून चाहते चिंतेत आले आहे.

(Salman Khan's swollen eyes at Karan Deol's reception worries fans viral video)

सलमान खान या रिसेप्शन पार्टीत सहभागी झाला होता, त्याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट त्याने परिधान केलेला दिसत आहे. मात्र, यावेळी सलमानचे सुजलेले लालबूंद डोळे आणि उतरलेला चेहरा पाहून सगळेच अस्वस्थ झाले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे नेमकं का आणि कशामुळे झालं हे अद्याप समोर आलेलं नाही. अनेकांनी तो फिट असल्याचंही म्हंटलं आहे. पण चाहते मात्र सध्या काळजीत आहेत.

सलमान खान सध्या त्याच्या 'बिग बॉस ओटीटी २' मुळे चर्चेत आहे. गेले काही दिवस चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत होते. १७ जूनपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सध्या या शोमध्ये नेमकं काय घडतंय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT