Salman Khan ( Radhe in Tere Naam) Google
मनोरंजन

सलमानच्या 'तेरे नाम' चा सीक्वेल? काय आहे दिग्दर्शकाची Story Idea...

'तेरे नाम' पाहून सलमानच्या अभिनयावर टीका करणाऱ्यांनीही त्याचं तोंडभरुन कौतूक केलं होतं.

प्रणाली मोरे

सलमान खान(Salman Khan)च्या आतापर्यंतच्या सिनमांपैकी 'तेरे नाम' सिनेमा अनेकांना भावला. सलमानला अभिनय जमत नाही. फक्त दिसायला देखणा अन् पिळदार शरीरयष्टी असल्यामुळं त्याला सिनेमे मिळतात असं बोलणाऱ्यांची तोंडं देखील सलमाननं 'तेरे नाम' मध्ये रंगवलेला राधे पाहून बंद झाली होती. 'तेरे नाम' सिनेमातील सलमानची हेअर स्टाईलही भलतीच गाजली होती. अर्थात अनेकांनी तसा राधे हेअरकट करवून घेतला होता. या सिनेमात सलमानसोबत भूमिका चावला होती. सलमानच्या चाहत्यांना सिनेमातील सलमानची व्यक्तीरेखा, लूक आणि प्रेमाविषयीचं त्यानं आपल्या अभिनयाच्या माध्यमातून दाखवलेलं वेड भलतंच आवडलं होतं. पण सिनेमाचे दिग्दर्शक सतिश कौशिक यांनी मात्र एक मोठा खुलासा केलाय की सलमानला राधे साकारायचाच नव्हता. त्याला ती भूमिका आपण करु शकू असं वाटलंच नव्हतं. तसंच तेरे नामचा सीक्वेल काढायचाय,कथानक ठरलंय यासर्वांविषयी काय म्हणालेयत सतिश कौशिक?

सतिश कौशिक (Satish Kaushik) यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे,''सलमान 'तेरे नाम'चं कथानक ऐकल्यावर सिनेमा चांगला आहे,पण सिनेमातली माझी भूमिका चुकीचा संदेश देतेय असं म्हणाला होता. शाहिदचा 'कबिर सिंग' हा 'तेरे नाम' सिनेमावरच आधारित आहे असं देखील मस्करीत सतिश कौशिक म्हणाले आहेत. 'तेरे नाम'च्या सीक्वेलविषयी सतिश कौशिक यांचं म्हणणं आहे, आताच्या काळात हा सिनेमा किती आवडेल याबाबत मी साशंक आहे. तो वेगळा विचार करुन दाखवावा लागेल. आणि ते कितपत प्रेक्षकांना रुचेल हे सांगता यायचं नाही. खूप मोठी जबाबदारी ठरेल 'तेरे नाम' सिनेमाचा सीक्वेल काढणं''.

''हा सिनेमा संपू्र्ण प्रेमकथा दाखवायची की इतरही काही महत्त्वाच्या घटना या सिनेमाचा महत्त्वाचा भाग असतील हे खूप विचारपूर्वक ठरवावं लागेल. 'तेरे नाम' मधील तो वेडा प्रेमी कदाचित आता दाखवणं अनेक जणांना योग्य वाटणार नाही. जर प्रेमात नकार मिळाला तरीही समोरच्यावर प्रेमाची जबरदस्ती करणं खंरच योग्य नाही''. सतिश कौशिक यांनी 'तेरे नाम 2' चं कथानक आपल्या डोक्यात आहे असं त्या मुलाखतीत म्हटलं होतं. पण हा विषय अद्याप सलमान खानशी आपण बोललो नसून अजून काहीही ठरलेलं नाही असं देखील त्यांनी नमूद केलं. त्यामुळे आता कधी सतिश कौशिक तेरे नाम सिनेमाचा सीक्वेल काढणार,सलमानचं याविषयी काय मत असेल,राधे कोण रंगवणारा अशा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT