Salman Khan to build 19 floor hotel in bandra sea facing property sakal
मनोरंजन

Salman Khan : सलमान खान बांधणार 19 मजली हॉटेल! काय काय असेल यात? वाचा एका क्लिकवर..

सलमान खानचे हॉटेल व्यवसायात पदार्पण..

नीलेश अडसूळ

Salman Khan hotel : अभिनेता सलमान खान आता 'साठी' गाठत आला तरी त्याची हवा काही कमी झालेली नाही. अजूनही चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी वेडेपिसे होतात. त्यांच्या चाहत्यांनी त्याला दिलेली 'भाईजान' ही ओळखच त्यांचं प्रेम सांगून जाते.

काही दिवसांपूर्वीच त्याचा 'किसीका भाई किसी की जान..' हा चित्रपट येऊन गेला. आता भाईजानने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. भाईजान आता एका मोठ्या व्यवसायात पदार्पण करत आहे.

कलाकार म्हंटलं की त्यांचे संबंध कोणत्या ना कोणत्या व्यवसायासही जोडलेले असतातच. सलमाननही एका मोठ्या व्यवसायात उडी घेतली आहे. तो स्वतःचे हॉटेल सुरू करणार आहे.

(Salman Khan to build 19 floor hotel in bandra sea facing property)

सलमान आता मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर 19 मजली हॉटेल बांधणार आहे. ही बातमी समजताच भाईजानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्टर रोडवरील सी-फेसिंग प्लॉटवर ही हॉटेल बांधण्यात येणार आहे. 'बीएमसी'ने त्याच्या या हॉटेलच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचंही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

साधारण 19 मजली हे हॉटेल असणार आहे. त्याची उंची अंदाजे 69.9 मीटर असेल. बीएमसीकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार तीन स्तरांचे तळघर, पहिला आणि दुसरा मजला कॅफे आणि रेस्टॉरंटसाठी, तिसरऱ्या मजल्यावर जिम आणि जलतरण तलाव तर चौथा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी असेल.

यामध्ये पाचवा आणि सहावा मजला कन्व्हेन्शन सेंटरसाठी असेल. तसेच सात ते 19 मजल्यापर्यंतचे मजले हॉटेल वापरासाठी असतील. हे हॉटेल सुरू होण्यासाठी अजून बरीच वर्षे लागणार आहेत. परंतु त्याची बातमी आता वाऱ्याच्या वेगासारखी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT