Salman Khan Google
मनोरंजन

'सलमानने चारचौघात तिला मागून...'; चाहत्यांनी देखील चांगलच सुनावलं

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

सलमान खान(Salman Khan)च्या आयुष्यात आतापर्यंत असे अनेक प्रसंग आले की त्यामुळं तो अनेकदा संकटात सापडलाय,त्याच्यामुळे अनेकदा मोठे वाद निर्माण झालेयत. त्याच्या आयुष्यातील प्रेम प्रकरणांनीही तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण अनेकदा तो त्याच्या चाहत्यांच्या त्याच्यावरील प्रेमामुळे काही प्रकरणातून बाहेर पडलाय, तर अनेकदा त्याच्याकडील बक्कळ पैशाच्या जोरावर त्याचं पारडं जड ठरलंय. पण आता एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे,जो पाहिल्यानंतर अनेक जण म्हणत आहेत की सलमाननं हे केलं ते काही बरोबर नाही. तर नेमकं झालं काय आणि कुठला,कधीचा आहे तो व्हि़डीओ? चला,जाणून घेऊया.

सलमान खाननं दोन महिन्यांपूर्वीच दुबईत एक दबंग टूर केली होती.ज्यात त्यानं पूजा हेगडेसोबत 'झुम्मे की रात है' या गाण्यावर ठेका धरला होता. त्याच दरम्यान तो पूजाच्या मागे मागे वेगळ्याच पद्धतीत जात होता,तो खाली वाकत गाण्याची फेमस कुठली ती स्टेप करत होता तितक्यात स्टेजवर तो सर्वांसमक्ष पडला. पडताना आधारासाठी त्यानं पूजाचा शॉर्ट ड्रेस नकळत मागनं पकडला. पण त्याचा तेवढाच तो व्हि़डीओ व्हायरल झाला अनं नको त्या चर्चेला सुरुवात झाली. खरंतर हे ओरिजनल गाणं सिनेमात चित्रित झालं आहे ते सलमान आणि जॅकलिनवर. या गाण्यानं रीलीजनंतर सर्वांनाच आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडलं होतं.

त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्याच्या एका चाहत्यानं त्याची बाजू मांडत म्हटलंय,''तो या गाण्यातील फेमस स्टेप करायला गेला आणि गोंधळल्यामुळे पुढचं सगळं घडलं असावं''. तर दुसरी प्रतिक्रिया देखील सलमानचं समर्थन करणारी अशा प्रकारचीच आहे. पण काहीजणांनी मात्र सलमानच्या त्या स्टेपला विचित्र म्हटलंय. कुणी,' काय हा बावळटपणा' म्हटलंय तर कुणी शिविगाळही केलीय. असो, आता सलमाननं देखील थोडा सराव करायला हवा होता ना. आता सुपरस्टार असलो म्हणजे सगळंच जमतं प्रत्येकवेळेला असं काही नाही नं.

सलमानचं हे गाणं २०१४ मधील त्याच्या 'कीक' सिनेमातील आहे. साजिद नाडियादवालानं या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात त्याच्यासोबत रणदीप हुडा,नवाझुद्दिन सिद्दिकी देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. सलमानचा 'कीक २' देखील लवकरच बसणार आहे. लवकरच त्याचा 'कभी ईद,कभी दिवाली' हा सिनेमा देखील भेटीला येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT