सलमान खान esakal
मनोरंजन

सलमानची गांधीगिरी! साबरमती आश्रमाला भेट, चरख्यावर सूतकताई

अंतिम चित्रपटाच्या रिलीजनंतर सलमान खानने साबरमती आश्रमला भेट दिली.

सकाळ डिजिटल टीम

सलमान खानचा नवा चित्रपट 'अंतिमः द फायनल ट्रूथ' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलमानने वेळ काढून अहमदाबादमधील 'साबरमती' आश्रमाला भेट दिली. विशेष म्हणजे सलमानने यावेळी चरखालाही चालवला. साबरमती आश्रमात महात्मा गांधी १९१७ ते १९३० पर्यंत वास्तव्यास होते. या भेटीदरम्यान सलमानसोबत 'अंतिम'चे दिग्दर्शक महेश मांजरेकर सुद्धा उपस्थित होते.

सलमाननं साबरमती आश्रम भेटीदरम्यान चरख्यावर सुतकताई केली.

साबरमती आश्रमाच्या भेटीने सलमाननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे त्याने यावेळी चरखा चालवला आणि सूतकताई केली. सलमानने येथील व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी केली. साबरमती आश्रमाकडून त्याला चरखाअसलेलं स्मृतिचिन्ह आणि गांधीजींवरील पुस्तक भेट देण्यात आले.

सलमानने साबरमती आश्रमाच्या बुकमध्ये सही केली.

सलमान आणि आयुष शर्मा यांची मुख्य भूमिका असलेल्या अंतिम: द फायनल ट्रूथ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या विकेंडअखेर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. सत्यमेव जयते २ आणि दिवाळीला रिलीज झालेल्या सूर्यवंशी यांच्या स्पर्धेला तोंड देत अंतिमने तीन दिवसांत १८.६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT