Mahesh Manjrekar and Salman Khan file view
मनोरंजन

'भाईजान'ची बिग बॉस मराठीच्या चावडीवर एंट्री

या आठवड्यात सलमान खान बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) हा सध्या हिंदी बिग बॉसचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. आता बिग बॉस मराठीच्या (Salman Khan on Bigg Boss Marathi) चावडीवर सलमान हजेरी लावणार आहे. आधी याबाबत सोशल मीडियावर फक्त शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता सलमान बिग बॉस मराठीच्या चावडीवर खास एंट्री घेणार आहे हे कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन जाहीर करण्यात आलं आहे. बिग बॉस मराठीच्या स्टेजवर तो मराठीतून बोलताना दिसणार आहे.

बिग बॉसचे प्रेक्षक या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते. बिग बॉस मराठी सीझन ३ च्या चावडीवर सदस्यांना ‘सरप्राईझ’ मिळणार आहे. कारण बॉलिवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे. बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एंट्री होणार आहे. त्यामुळे या आठवड्यातील चावडी सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर यांनी जाहीर केलं, “आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा”. त्याचसोबत सलमान खानने देखील सांगितलंय “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर”.

बिग बॉस मराठीचं सध्या तिसरं पर्व सुरू आहे आणि या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करतात तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीच १५ पर्व सुरु आहे. याच हिंदी बिग बॉसच्या मंचावर काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. तो भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या आठवड्यात काय धम्माल मस्ती होणार ते प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या चावडीवर शनिवार – रविवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT