Salman Khan's Security Pushes Vicky Kaushal Away at IIFA; shocking Video Viral  sakal
मनोरंजन

Salman Khan: सलमान पुढं विकीला कुणी विचारेना.. असं काय घडलं? तुम्हीच बघा; व्हिडिओ व्हायरल..

सलमान आणि विकी मध्ये तेढ.. आता व्हिडिओतून स्पष्टच दिसलं..

नीलेश अडसूळ

iifa 2023 salman khan and vicky kaushal: सध्या बॉलीवुडमध्ये लगबग आहे आयफा पुरस्कार सोहळ्याची ''IIFA 2023''.. हा अत्यंत बहुमानाचा सोहळा लवकरच दुबई येथे पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने बॉलीवुड मधले तारे दुबई मध्ये दाखल होत आहेत. अशातच एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे.

आयफा सोहळ्याच्या दरम्यान होणाऱ्या भेटीगाठी कायमच चर्चेत असतात. यावेळी अभिनेता विकी कौशल आणि सलमान खान एकमेकांच्या समोर आले. यावेळी असं काही झालं की वरून आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

(Salman Khan's Security Pushes Vicky Kaushal Away at IIFA; shocking Video Viral)

या व्हिडिओ मध्ये विकी कौशल उभा असतो त्याच्या सोबत काही मंडळी असतात आणि अचानक समोरून बॉलीवुडचा भाईजान सलमान खान येतो. सलमान सोबत बरेच बॉडीगार्ड, कॅमेरा पर्सन असा मोठा लवाजमा असतो.

सलमानला पाहून विकी थांबतो आणि सलमानला हाय-हॅलो करतो. एवढच नाही तर विकी सलमानशी बोलण्याचाही प्रयत्न करतो. पण सलमान मात्र त्यांच्याशी काहीही न बोलता, त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो.

एवढेच नाही तर यावेळी सलमान (salman khan) सोबत असणारे बॉडीगार्ड आणि इतर मंडळी विकिला धक्का देत पुढे जातात. एखाद्या अनोळखी माणसाला मिळावी तशी वागणूक विकिला सलमान कडून मिळाल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

ही व्हिडिओ सध्या बरीच चर्चेत असून कुणी सलमान खान च्या रुबाबाचे कौतुक करत आहे तर कुणी त्यावर टीका करत आहे. विकीचे (vicky kaushal) चाहते मात्र हा व्हिडिओ पाहून नाराज झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT