arpita and ayush news  
मनोरंजन

सलमानची बहिण हॉटेलातील प्लेट फोडत बसली ; व्हिडिओ व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सोशल मीडियावर आता बॉलिवूडचा भाईजान सलमानच्या बहिणीचा म्हणजे अर्पिताचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर हिटस मिळत आहे. तो व्हिडीओच तसा आहे. त्यात अर्पिता ही एका हॉटेलातील प्लेटस फोडत असल्याचे दिसत आहे. ती तसे का करत आहे हे माहिती करुन घ्यायचे असल्यास तो व्हिडीओ पूर्ण पाहावा लागेल. अर्पिता तशी सोशल मीडियापासून लांब राहणारी आहे. मात्र तिच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अर्पिता ही एका रेस्टॉरंटमध्ये गेली आहे. तिच्यासोबत तिची एक मैत्रीणही आहे. त्यावेळी तिथे ती प्लेटस तोडताना दिसून आली आहे. विशेष म्हणजे तिनं आपली ही स्टोरी इंटास्टाग्रामवर शेयर केली आहे. आणि ते सगळेजण मिळून प्लेटस तोडत आहेत. याशिवाय त्यात अर्पिताचा मुलगा अहिलपण सहभागी झाला आहे. पण हे असे सगळे का करत आहे, यावर कुणीच काही बोलत नाही. अहिल हा त्याच्या घरी प्लेटस फोडत आहे.

आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं आयुषसाठी एक विशेष पोस्ट अर्पितानं लिहिली होती. ती तिनं सोशल मीडियावर शेयर केली. त्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिनं जी एक पोस्ट शेयर केली आहे तिनं असे लिहिले आहे की, माझा एक मित्र ते पती हा जो प्रवास आहे त्याविषयी मी काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तो सगळा प्रवास मी कथन केला आहे. असा प्रवास जो आम्ही दोघांनी एकत्र मिळून करण्याचे ठरवले आहे.

आमची पहिली सहा वर्षे ही खूप संस्मरणीय अशी आहेत.यात आम्ही एकमेकांना समजून घ्यायला वेळ दिला आहे. यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. एकत्र आनंदोत्सव साजरा करणं ही काही आमची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आम्ही अशाच प्रकारे एकत्र सेलिब्रेशन केलं आहे.

यावर आयुषनंही अर्पितासाठी मेसेज लिहिला आहे तो म्हणतो, अर्पिता तुला लग्नाच्या वाढचिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला यासाठी मी स्वताला नशीबवान समजतो. या दोघांनाही दोन मुले आहेत. आयुष हा त्याच्या आगामी अंतिम या चित्रपटाच्या चित्रिकरणात बिझी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात सलमानही झळकणार आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhaji Maharaj Statue Mohol : सोलापुरातील मोहोळ शहरात विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, पोलिस छावणीचे स्वरूप

कॅमेरासमोर महिला स्पर्धकाला घातली आंघोळ, एल्विश यादवच्या शो पाहून प्रेक्षक नाराज, टी-शर्ट काढला आणि... Viral Video

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

Photos : 35 कोटी वर्षे दुर्मिळ 'हसणारा' दगड! ज्याला समजलं होतं नकली दात; तो निघाला प्राचीन जीव, जगभर फोटो व्हायरल

IND vs SA, Playing XI: भारतीय संघ एका बदलासह दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार? बघा कोणाचा पत्ता कट होणार; अभिषेक शर्मा कायम...

SCROLL FOR NEXT