Salman Society movie teaser out now  Esakal
मनोरंजन

Salman Society: "बस्स झाला आता शाळेचा खेळ...", शिक्षणासाठी लहानग्याची धडपड; सलमान सोसाइटीचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला !

Vaishali Patil

Salman Society movie teaser out now: मनोरंजन विश्वात सध्या मराठी चित्रपटांची चांगलिच चर्चा आहे. आता त्यातच 'सलमान सोसायटी' हा मराठी चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे.

नुकतच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'पार्टी दणाणली...' असे या गाण्याचे बोल होते. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या आशयाचा हा सिनेमा आहे. चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेची कल्पना येते.

एका लहानग्याला शाळेची ओढ या चित्रपटात दाखवली आहे. अनाथ मुलाची शिक्षण घेण्यासाठीची धडपड आणि त्यासाठी त्याने आणि त्याच्या सोबतच्या मित्रांनी लावलेली शक्कल या चित्रपटाच्या टिझरमध्ये दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटात गौरव मोरे एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार हे बाल कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे.

पुष्कर या चित्रपटात बाल कलाकाराच्या भुमिकेत आहे त्याने या आधी 'एलिझाबेथ एकादशी', 'बाजी', 'रांजण', 'चि .व चि .सौ. का', 'फिरकी' आणि 'टी. टी. एम. एम' झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे.

शुभम मोरेने हिंदी चित्रपट 'रईस'मध्ये बालपणीच्या शाहरुख खानची भूमिका साकारली होती. त्याच बरोबर त्याने 'हाफ टिकिट', 'फास्टर फेणे' जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत आहेत.

तर विनायक पोतदार याने 'हाफ टिकिट', 'ताजमहल' आणि 'येरे येरे पावसा, माउली'मध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

''पार्टी दणाणली' या गाण्यानंतर हा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. प्रजक्ता एंटरप्राइजेस आणि विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी 17 नोव्हेंबर 2023 ला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT