Sam Bahadur teaser connection with india vs pakistan world cup  esakal
मनोरंजन

Sam Bahadur Movie : 'सॅम बहादूर' चित्रपट अन् 'भारत-पाकिस्तान' मॅचचं काय आहे खास कनेक्शन, माहितीये?

यासगळ्यात विकी कौशलच्या राझी या चित्रपटानं प्रेक्षकांना वेडं केलं होत. त्यात त्याच्यासोबत आलियानं स्क्रिन शेयर केली होती.

युगंधर ताजणे

Sam Bahadur teaser connection with india vs pakistan world cup : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं विकी कौशलनं चाहत्यांची पसंती मिळवल्याचे दिसून आले आहे. अशावेळी त्यानं आपण मोठ्या ताकदीचे अभिनेते आहोत हेही दाखवून दिले आहे. त्याच्या यापूर्वीच्या उरी, सरदार उधम चित्रपटांना चाहत्यांची पसंती मिळवली होती.

यासगळ्यात विकी कौशलच्या राझी या चित्रपटानं प्रेक्षकांना वेडं केलं होत. त्यात त्याच्यासोबत आलियानं स्क्रिन शेयर केली होती. आलिया आणि विकीच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंतही केले होते. सरदार उधमसाठी त्याला फिल्मफेयरचा पुरस्कारही मिळाला होता. त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर विकीनं काही विनोदीपटांमध्ये काम केले त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती.

Also Read - लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

राजी चित्रपटानंतर विकी कौशलनं सॅम बहादुरनं मेघना गुलजार यांच्यासोबत आणखी एका प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतला आहे. त्या प्रोजेक्टचे नाव सॅम बहादूर असे आहे. १९७१ साली भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये मोठी कामगिरी केलेल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. त्यात जनरल सॅम माणेकशा यांची भूमिका विकी कौशलनं साकारली आहे.

सॅम माणेकशा यांनी जगाचा नकाशा बनविण्यात महत्वाची भूमिका साकारली होती. येत्या काळात जनरल माणेकशा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून त्याची चाहत्यांना त्याची कमालीची उत्सुकता आहे. त्याचा टीझर प्रेक्षकांसमोर आला असून त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.त्या चित्रपटाविषयी चर्चेलाही सुरुवात झाली आहे.

विकीचा सॅम बहादूर हा चित्रपट १३ ऑक्टोबरला मुंबईत त्याचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी निर्माते आणि क्रु हजर असणार आहे. टीझरच्या निमित्तानं मोठे मार्केटिंग देखील करण्यात येणार आहे. चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे. त्याची टक्कर रणबीर कपूरच्या अॅनिमल सोबत असणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. निर्माते रॉनी स्क्रूवाला हे भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याच्या दरम्यान या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास ही तमाम प्रेक्षकांसाठी देखील मोठी आनंदाची पर्वणी असणार आहे. निर्मात्यांना प्रेक्षकांपर्यत चित्रपट पोहचविणे शक्य होणार आहे.

सॅम बहादूर या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. त्यापूर्वी त्यांनी तलवार, राजी आणि छपाक सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सॅम बहादूरमध्ये फातिमा सना देखील दिसणार आहे. सान्या मल्होत्रा महत्वाच्या भूमिकेत आहे. सॅम बहादूर या चित्रपटानंतर विकी हा प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT