Sam Bahadur Rekha tribute in front of the poster of 'Sam Bahadur' is appreciated everywhere  SAKAL
मनोरंजन

Sam Bahadur: 'सॅम बहादूर'च्या पोस्टरसमोर रेखा यांनी असं काय केलं की सर्वत्र होतंय त्यांचं कौतुक

सॅम बहादुरच्या सिनेमाच्या स्क्रीनींगवेळी रेखा यांनी केलेल्या कृतीचं सगळीकडून कौतुक

Devendra Jadhav

Sam Bahadur: विकी कौशलच्या सॅम बहादूर सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. हा सिनेमा उद्या १ डिसेंबरला भेटीला येतोय. विकी कौशलने सिनेमात भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे.

या सिनेमाचं काल मुंबईत अंधेरी येथे स्पेशल स्क्रिनींग पार पडलं. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनीही स्क्रीनींगला हजेरी लावली होती. त्यावेळी रेखा यांनी एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

(Sam Bahadur poster)

रेखा यांनी सॅम बहादूरचं पोस्टर पाहून केली 'ही' कृती

'सॅम बहादूर'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये रेखा उपस्थित राहिल्या. त्यांनी काळ्या रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. रेखा रेड कार्पेटवर येताच त्यांच्या स्टाईलने लोकांचं मन जिंकलं.

वास्तविक, रेखा यांनी कॅमेऱ्यासमोर पोझ त्यांचं लक्ष सिनेमाच्या पोस्टरकडे गेलं. रेखाने आपले दोन्ही हात जोडून पोस्टरला नमस्कार केला. भारतीय जवानांप्रती रेखाने केलेली ही आदरयुक्त कृती पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पारसी समाजाची सॅम माणेकशॉ यांना आदरांजली

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे पारशी समाजाचे होते. त्यामुळे टाटा ग्रुप, पूनावालास ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, गोदरेज ग्रुप आणि शापूरजी पालनजी ग्रुपसह पारशी नेतृत्व असलेल्या प्रमुख कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना सॅम माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ सॅम बहादूर चित्रपटाचे विशेष स्क्रिनींग आयोजित करणार आहेत. सॅम माणेकशॉ यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी असा उद्देश असणार आहे.

सॅम बहादुरची उत्सुकता शिगेला

‘सॅम बहादुर’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून त्यांनी भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्या समवेत या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी ‘आरएसव्हीपी मूव्हीज’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

'मी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला होता. कारण...' रितेश देशमुख म्हणाला, 'सेट उभा करण्यासाठी जागा नव्हती तेव्हा त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : अमरावतीत स्कूलबसच्या भाड्यात २५ टक्के वाढ

बेटा तुला डॉक्टर व्हायचं बेटा... RCC च्या शिवराज मोटेगावकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलासाठी कसा मिळवला NEET पेपर? मोठं नाव समोर

Hasan Mushrif : साखर कारखानदारांवर सामूहिक आत्महत्येची वेळ, मुश्रीफ असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT