Sam Bahadur Sunny Kaushal Reaction  esakal
मनोरंजन

Sunny Kaushal On Sam Bahadur : 'भावानं मला रडवलं', 'सॅम बहादूर' पाहिल्यावर विकीचा भाऊ भावूक! काय होती पहिली प्रतिक्रिया?

सॅम बहादूरच्या त्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी विकीचे कुटूंबीय उपस्थित होते.

युगंधर ताजणे

Sam Bahadur Sunny Kaushal Reaction - प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल याची मुख्य भूमिका असलेला सॅम बहादूर हा एक डिसेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे. त्यानिमित्तानं टीमकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करण्यात येत आहे. सॅम बहादूरचे खास स्क्रिनिंगही आयोजित करण्यात आले होते. यावेळी विकी कौशलचे कुटूंब उपस्थित होते. त्यात त्याच्या भावानं सनी कौशलनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

सॅम बहादूरच्या त्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी विकीचे कुटूंबीय उपस्थित होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात विकीच्या भावाच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं आपण जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा कमालीचे भावूक झालो असे म्हटले आहे. याशिवाय त्यानं दिग्दर्शक मेघना गुलजार यांचेही आभार मानले आहेत.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

विकीचा भाऊ सनीनं इंस्टावर पोस्ट लिहून सॅम बहादूरविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यानं त्यात म्हटलं आहे की, चित्रपट पाहिला आणि रडू आलं. कमाल केली आहे विकीनं, अभिनय, कथा, त्याचे सादरीकरण हे सारं प्रभावी आहे. दिग्दर्शकाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांची मेहनत दिसून येते. हा चित्रपट अद्भुत आहे. तो पाहणे हा एक वेगळा अनुभव असणार आहे. हे मी आवर्जून सांगतो. असे सनीनं म्हटले आहे.

विकी कौशलचा सॅम बहादूर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. अखेर तो उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशातल्या काही शहरांमध्ये त्याचा प्रीमिअर पार पडला असून त्याचे आलेले रिव्ह्यू जोरदार आहेत. विकी आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांचे कौतुक करणार आहे. अशातच काही सेलिब्रेटींच्या प्रतिक्रियेनं सॅम बहादूरविषयी उत्सुकता वाढली आहे.

Sam Bahadur

या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगविषयी सांगायचे झाल्यास त्याला अॅनिमलच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. पण दोन्ही चित्रपटांचे विषय पूर्णपणे वेगळे आहेत. त्यातील स्टारकास्टही वेगळी आहे. अशावेळी येत्या दिवसांत प्रेक्षकांची कुणाला सर्वाधिक पसंती मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सॅकनिल्कच्या एका रिपोर्टनुसार आतापर्यत या चित्रपटाचे ५७ हजार ८८८ तिकिट बूक झाले आहेत.

सॅम बहादूरनं अॅडव्हान्स बुकींगमधून दोन कोटींची कमाई केली आहे. हा आकडा अॅनिमलपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे रणबीरच्या अॅनिमलचे सॅम बहादूरपुढे मोठे आव्हान असणार असल्याचे बोलले जात आहे. उद्या हे दोन्ही चित्रपट एकमेकांसमोर येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT