Samantha Akkineni  
मनोरंजन

"तुम्हाला थोडीसुद्धा अक्कल नाही का?", घटस्फोटाविषयी विचारताच समंथा भडकली

समंथा-नाग चैतन्य घटस्फोट घेणार असल्याची चर्चा

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu आणि नाग चैतन्य अक्किनेनी Naga Chaitanya यांच्या नात्यातील दुराव्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. समंथाने तिच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवरून अक्किनेनी हे आडनाव काढल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली. समंथा किंवा नाग चैतन्यने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत दिली नव्हती. मात्र नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगादरम्यान एका पत्रकाराने समंथाला तिच्या घटस्फोटाविषयी प्रश्न विचारला. समंथा तिरुमला मंदिरात देवदर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन बाहेर पडताना तिला पत्रकाराने नाग चैतन्यपासून विभक्त होणार का, असा प्रश्न विचारला. हे ऐकून समंथाचा पाराच चढला.

"मी मंदिरात देवदर्शनासाठी आले आहे. तुम्हाला थोडीसुद्धा अक्कल नाही का?", अशा शब्दांत समंथाने संबंधित पत्रकाराला उत्तर दिलं. घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप समंथा किंवा नाग चैतन्यने स्पष्टपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी हे दोघं वैवाहिक आयुष्यातील मतभेद मिटवण्यासाठी सल्लागारांकडे आणि कौटुंबिक न्यायालयात गेल्याचंही म्हटलं जातं आहे. 'लव्ह स्टोरी' या चित्रपटाच्या शूटिंगपासून या दोघांमध्ये वाद सुरु झाले. सहकलाकार साई पल्लवीसोबत नाग चैतन्यची जवळीक वाढल्याने वैवाहिक आयुष्यात समंथासोबत वाद सुरू झाले अशी चर्चा आहे.

समंथा आणि नाग चैतन्यने २०१७ साली गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं. लग्नानंतर तिने सर्व सोशल मीडिया हँडल्सवर समंथा अक्किनेनी असं नाव बदललं होतं. आता चैतन्यसोबत वादाच्या पार्श्वभूमीवर तिने आडनाव काढून टाकल्याचं समजतंय. इतकंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या नागार्जुन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलासुद्धा ती उपस्थित नव्हती. कौटुंबिक कार्यक्रमातील तिच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. समंथा आणि नाग चैतन्य यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आता नागार्जुन प्रयत्न करत असल्याचं समजतंय.

काय म्हणाले नागार्जुन?

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार घटस्फोटाच्या चर्चांवर नागार्जुन म्हणाले, "नाग चैतन्यने कधीही त्याच्या पत्नीची फसवणूक केली नाही. याउलट, २०१७ साली लग्न केल्यापासून तो नेहमीच एक प्रेमळ पती म्हणून वागला आहे. वैवाहिक आयुष्यातील कोणत्याही नियमाचं, वचनाचं उल्लंघन त्याने केलं नाही. मजिली या चित्रपटात त्याला ऑनस्क्रीन पत्नीसोबत (समंथा) रागाने वागावं लागलं होतं. असं असतं तरी आपल्या पत्नीसाठी कॅमेरात द्वेषाने पाहणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. आता जेव्हा त्याला समंथासोबत मतभेद दूर करण्यास सांगितलं जातंय, तेव्हा त्याला नक्की कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT