Samantha and naga chaitanya Reunite? Read what we know Esakal
मनोरंजन

Samantha- नागाचैतन्यचा घटस्फोटानंतर १ वर्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार,चर्चेला उधाण...

समंथा रुथ प्रभूच्या अजारपणाचा खुलासा झाल्यानंतर नागाचैतन्यने तिची भेटही घेतली होती आणि त्यांच्यात फोनवरनं वारंवार संवादही होत असल्याचं समोर आलं आहे.

प्रणाली मोरे

Samantha Ruth Prabhu: दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री 'ऊ अंटावा गर्ल' समंथा रुथ प्रभू सध्या बरीच चर्चेत आहे. तिनं काही दिवसांपूर्वीच आपल्या आजाराविषयी मोठा खुलासा केला होता. तिच्या आजाराविषयी जाणून घेतल्यानंतर तिचे चाहते मात्र चिंतेत पडले होते. असंही कळत होतं की तिचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता नागाचैतन्य आणि सासरे अभिनेते नागार्जुन तिची विचारपूस करण्यासाठी तिला भेटले होते. नागाचैतन्य आणि समंथा यांनी फोनवरनं देखील संवाद साधला. बोललं जात आहे की नागाचैतन्य आणि समंथा पुन्हा एकदा आपल्यातील वाद विसरुन एकत्र येत आहेत. आता हे वैयक्तिक पातळीवर घडणार आहे की व्यावसायिक..चला त्याविषयी जाणून घेऊया.(Samantha and naga chaitanya Reunite? Read what we know)

एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार,समंथा रुथ प्रभू आणि नागाचैतन्य दोघे घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र बनून राहिले आहेत. आपल्यातील वैयक्तिक वाद बाजूला ठेवत व्यावसायिक पातळीवर एकत्र काम करायला त्यांना काहीच हरकत नाही. नागाचैतन्य आणि समंथानं याआधी अनेक सिनेमांतून एकत्र काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांनाही आवडते.

समंथा आणि नागाचैतन्य यांनी २०१० मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. २९ जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर समंथानं सोशल मीडियावर आपल्या नावासोबत अक्किनेनी हे नागाचैतन्यचे आडनावही जोडलेले सर्वांनी पाहिले. पण यानंतर २ ऑक्टोबर २०२१ ला दोघांनी आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं.

समंथा काही दिवसांपूर्वी 'कॉफी विथ करण ७' या चॅट शो मध्ये आली होती. तिनं अक्षय कुमारसोबत काऊच शेअर केलेला आपण सर्वांनीच कदाचित पाहिलं असेल. या शो मध्ये तिनं नागाचैतन्य सोबतच्या आपल्या तुटलेल्या नात्यावर भाष्य केलं होतं. या शो नंतर समंथा सोशल मीडियावरनं गायब झाली होती. तिचं सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमात हजेरी लावणं बंद झालेलं दिसून आलं. त्या दरम्यान बातमी समोर आली ती तिच्या आजाराची. परदेशात ती इलाज करायला गेल्याचं देखील कळालं.

यानंतर समंथानं सोशल मीडियावरनं चाहत्यांशी स्वतः संवाद साधत सांगितलं की ती ऑटो-इम्यून मायोसिटिस या आजाराशी झुंज देत आहे. या बातमीनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

तिच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर विजय देवरकोंडासोबत 'खुशी' सिनेमात ती लवकरच दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT