samantha ruth prabhu Sakal
मनोरंजन

Samantha: सामंथाने 'कुशी'च्या शूटिंगला केली सुरुवात, विजय देवरकोंडा आणि टीमने अभिनेत्रीचं असं केलं स्वागत

आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अभिनेत्री आता तेलुगु रोमँटिक चित्रपट 'कुशी'च्या सेटवर परतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

समंथा रुथ प्रभू तिच्या आगामी 'कुशी' चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. अलीकडे, अभिनेत्रीला आरोग्याच्या समस्येने ग्रासले होते, त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग लांबले. यानंतर, चाहते सोशल मीडियावर अभिनेत्रीकडून चित्रपटाशी संबंधित माहितीची मागणी करत होते.

त्यानंतर अभिनेत्रीने चाहत्यांना चित्रपटाच्या शूटिंगवर लवकरच परतण्याचे आश्वासन दिले. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अभिनेत्री आता तेलुगु रोमँटिक चित्रपट 'कुशी'च्या सेटवर परतली आहे.

या अभिनेत्रीने चित्रपटाच्या सेटवर परतून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले. काल, 8 मार्च म्हणजेच महिला दिनी, अभिनेत्रीने हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले. टीमने तिचे जल्लोषात स्वागत केले. विजय देवरकोंडा, दिग्दर्शक शिवा निर्वाण आणि टीमने तिचे केक कट करून स्वागत केले आणि महिला दिनही साजरा केला.

'कुशी'च्या टीमने समांथाचे स्वागत करण्यासाठी, तिला महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीत 13 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेटवर एक मोठा बॅनर लावला होता. दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी सेटवरील सामंथाचे काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती हसत होती.

फोटोंमध्ये ती विजय देवरकोंडा आणि 'कुशी' टीमसोबत केक कापताना दिसली. पीच रंगाच्या एथनिक सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. ही छायाचित्रे शेअर करताना दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी लिहिले की, 'द फायटर समंथा रुथ प्रभू 'कुशी'च्या सेटवर परतली आहे'.

'कुशी'चे शूटिंग बऱ्याच दिवसांनी पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता त्यामुळे लवकरच शूटिंग पूर्ण करण्याचा टीमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात काश्मीरमध्ये 'कुशी'चे पहिले शेड्युल पूर्ण झाले.

समंथाने उघड केले की ती मायोसिटिस नावाच्या दुर्मिळ रोगाने ग्रस्त होती. उपचारासाठी अभिनेत्रीने कामातून ब्रेक घेतला. त्यामुळे 'कुशी'चे शूटिंग अनेक महिने पुढे ढकलावे लागले.

फेब्रुवारी 2023 दरम्यान, समांथाने शूटिंगला उशीर झाल्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली होती आणि लवकरच शूटिंग सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आता समंथाने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. लवकरच चाहत्यांना समंथा आणि विजयची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT