Samantha  Esakal
मनोरंजन

Samantha: घटस्फोटानंतर समांथा पुन्हा पडली पुन्हा प्रेमात ? ट्विट करत म्हणाली, 'तुझ्यासारखं प्रेम'

सकाळ डिजिटल टीम

साउथस्टार अभनेत्री समांथा रुथ प्रभू ही मागील काही काळापासून अनेक कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी 'शकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुठलीही कसर सोडतांना दिसत नाही आहे.

ती हैदराबाद आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली आहे. ती चाहत्यांची लाडकी आहे. केवळ साउथच नाही तर तिची हवा जगभर आहे.

नुकतच समांथा तिच्या चाहत्याला ट्विटरवर दिलेल्या उत्तरामुळे चर्चेत आली आहे. त्याच झालं असं की, एका चाहत्याने समांथाला कोणालातरी डेट करण्याची विनंती केली. यावर समांथानं त्याला जे उत्तर दिलं त्यानं सर्वांची मनं जिंकली आहे.

26 मार्च रोजी एका चाहत्याने ट्विटद्वारे समांथाला विनंती करत ट्विट केलं की, 'ही त्याचा हक्क नाही, कृपया कोणाला तरी डेट कर.' समांथाही या चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना दिसली.

अभिनेत्रीने लिहिले, 'तुझ्यासारखं माझ्यावर कोण प्रेम करेल.' यासोबतच अभिनेत्रीने हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.

तिच्या या कृतीनं तिनं पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली आहे. तिचं हे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे. या ट्विटची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

समांथा रुथ प्रभू ही 'शाकुंतलम' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे . या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. 'शंकुतलम' 14 एप्रिल 2023 रोजी पदर्शित होणार आहे.

समांथाला ‘मायोसिटिस’ नावाचा आजार आहे. काही दिवसांपुर्वीच तिनं पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती. त्यानंतर चाहत्यांनी तिची खुप काळजी लागून होती.

त्यानंतर तिनं स्वत:वर खुप मेहनत घेतली. ती आजारपणामुळे ब्रेकवर होती. मात्र, त्यानंतर ती आता जोरदार पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे.

ती शाकुंतलम नंतर 'खुशी ' चित्रपटातही दिसणार आहे. तसेच, तिने तिच्या आगामी वेब सिरीज 'सिटाडेल' चे शूटिंग सुरु केले आहे, ज्यामध्ये ती बॉलिवूड स्टार वरुण धवन सोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

IND vs WI 1st T20I: वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? भारतीय प्रशिक्षकाने दिले महत्त्वाचे अडेट्स; म्हणाला...

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: महायुतीत बंडखोरीचे सत्र सुरूच; शेखर भोयर यांच्यानंतर भाजपच्या डॉ. संगीता शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT