Samantha Prabhu Says Her Biggest Mistake Was esakal
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यावर जीवापाड प्रेम केलं चूक झाली का? समंथानं बिनधास्तपणे सांगून टाकलं!

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Samantha Prabhu Says Her Biggest Mistake Was : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Samantha Ruth Prabhu Latest News) त्यामध्ये तिला तिच्या वैयक्तिक नात्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर तिनं दिलेली प्रतिक्रिया हा अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. समंथानं नेमकं काय विधान केलं हे आपण जाणून घेणार आहोत.

समंथा अन् नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला अन् चाहत्यांना मोठा धक्का (Samantha Naga Chaitanya News) बसला होता. साऊथ चित्रपट विश्वातील प्रसिद्ध जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले होते. त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये आलेल्या दुराव्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. दोघांनी (Samantha Divorce) एकमेकांवर वेगवेगळे आरोपही केले होते. सोशल मीडियावर कतरिनानं आस्क में एनीथिंग कार्यक्रमांतर्गत चाहत्यांना प्रश्न विचारण्यासाठी आवाहन केले होते.

समंथा तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असा प्रश्न तिला एका चाहत्यानं विचारला होता. त्यावर तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. समंथा (Ask Me Anything Samantha News) म्हणाली की, आयुष्यात माझी आवड निवड चुकली का असा प्रश्न मला पडतो.त्यातून मला काय शिकायला मिळाले याचाही मला आता विचार करण्याची वेळ आली आहे. समंथाची ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

चांगलं काय आणि वाईट काय हे मला काही लवकर कळलं नाही. तो माझ्यासाठी सर्वात कठीण प्रसंग होता. तिचं हे वक्तव्य वाचून नेटकऱ्यांनी तिनं ते तिच्या नागा चैतन्यच्या वैवाहिक आयुष्यावर केलेलं विधान आहे असा अंदाज बांधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT