Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya in a still from Majili. Instagram
मनोरंजन

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समंथाच्या इन्स्टाग्राम स्टोरीत दिसला नागा चैतन्य

समंथानं घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

समंथा रुथ प्रभूनं(Samantha Ruth Prabhu) घटस्फोटानंतर पहिल्यांदाच आपला पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य(Naga Chaitanya)सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला अन् लगोलग चर्चा रंगली. तिनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो तीन वर्षापूर्वीचा आहे. त्यांनी दोघांनी एकत्र काम केलेल्या 'माजिली' सिनेमातला. तेलुगु भाषिक रोमॅंटिक स्पोर्ट्स ड्रामा होता 'माजिली' सिनेमा. या सिनेमात नागा आणि समंथा मुख्य भूमिकेत होते. ५ एप्रिल २०१९ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ये माया चेसावे,मनम आणि ऑटोनगर सूर्या या सिनेमानंतर त्या दोघांनी एकत्रितपणे केलेला चौथा सिनेमा म्हणूनच नाही तर त्यांच्या लग्नानंतर पडद्यावर एकत्र या सिनेमाच्या माध्यमातून दिसले म्हणूनही 'माजिली'चं विशेष महत्त्व.

समंथानं त्या सिनेमातील एक क्षणचित्र शेअर केलं आहे. त्या फोटोत नागानं साकारलेल्या पूर्णा चंदर राव या व्यक्तिरेखेच्या चेहऱ्यावर रागाचे भाव दिसत आहेत. आणखी दोन फोटो त्या सिनेमाच्या पोस्टरवर दिसत आहेत. ज्यामध्ये एकात नागा आणि समंथाचा रोमॅंटिक मूड दिसत आहे. समंथानं या सिनेमात स्रावनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर दुसऱ्या फोटोत नागानं क्रिकेटची जर्सी घातली आहे,त्याच्यासोबत दिव्यांशा कौशिक आहे जीनं अंशू ही व्यक्तिरेखा सिनेमात साकारली होती. पोस्टरवर 'माजिला' ३ वर्ष पूर्ण असं सूचित करत लिहिलं आहे. समंथा नं #3yearsformajili# हॅशटॅग वापरला आहे. समंथानं गेल्या महिन्यात इन्स्टाग्रामवर नागाला अनफॉलो केल्यानंतर लगेचच तिनं हा फोटो या महिन्यात पोस्ट केल्यानं थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. तिनं नागाला अनफॉलो करताना एक पोस्ट लिहिली होती,ज्यात गूढ अर्थ सामावलेला होता. नागानंही सोशल मीडियावर त्याच्या नवीन प्रोजेक्टविषयी घोषणा केली आहे. नागा चैतन्य तेलुगु रोमॅंटिक कॉमेडी सिनेमात दिसला होता. आता तो बॉलीवूडमध्येही आमिरच्या लालसिंग चड्ढा मध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या हिंदी चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता असणार.

Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya in a still from Majili.

समंथा आणि नागा चैतन्यनं २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. हैदराबादमध्ये मोठ्या थाटात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आणि गोव्यात या दोघांनी हिंदू पद्धतीत लग्नगाठ बांधली होती. ख्रिश्चन पद्धतीनं देखील त्यांनी लग्न केलं होतं. पण काही कारणानं या दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला अन् दोघांनी एकत्रितपणे २ ऑक्टोबर २०२१ रोजी एक निवेदन प्रसिद्ध केलं ज्यात आपण घटस्फोट घेत असल्याचं जाहिर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी पनीर कचोरी, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2025

Satara News: 'धरणग्रस्त आजीला सात वर्षांनंतर न्याय'; ‘मराठवाडी’तील प्रश्न प्रशासनाने सोडविला, देय रक्कम देण्याबाबत कार्यवाही

अग्रलेख : संतुलित निवाडा

SCROLL FOR NEXT