Akshay Kumar Google
मनोरंजन

म्हणून अक्षयवर आली होती चोरीची वेळ

बॉलीवूडच्या खिलाडीनं ट्वीटरवर सांगितला चोरीचा मामला....

प्रणाली मोरे

अक्षय कुमार(Akshay Kumar) हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा जो आज बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. मुंबईचे रस्ते,बसेस,ट्रेन सारं काही एकेकाळी त्यानं प्रत्यक्षात अनुभवलंय पण आज सुपरस्टार झाल्यावरही त्या सा-या आठवणी तो उराशी बाळगून आहे. हात आकाशाला टेकले असतील त्याचे ,पण पाय मात्र जमिनीवर खिळून आहेत याचं उत्तम उदाहरण आहे तो. आता चोरी त्यानं आयुष्यात केलीय का? तर हो,चोरी त्यानं केलीय ती सुद्धा दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाच्या घरात. समंथाचं काय कनेक्शन? हो,बरोबर आहे तुमचं. चला जाणून घेऊया.

अक्षय कुमारने ट्वीटर अकाऊंटवर ही जाहिरात शेअर केलीय. या जाहिरातीत अक्षय एक चोर आहे,जो समंथाच्या घरात चोरी करण्यासाठी घुसतो. पण कुरकुरे पाहिल्यावर तो चोरी करायचे विसरतो. पण समंथा कुरकुरेमुळे अक्षयला पोलिसांना पकडून देण्यात यशस्वी होते. अशी ती एकंदरीत जाहिरात आहे. ही जाहिरात पाहिल्यावर राहून राहून वाटतंय समंथाचा पहिला बॉलीवूड सिनेमा नक्कीच अक्षय कुमारसोबत असणार. आता एखादी दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलीवूडमध्ये येणं काही नवीन नाही. पण समंथासारखी अभिनय,नृत्य आणि स्टंट करण्यातही तितकीच परफेक्ट असलेली अभिनेत्री बॉलीवूडच्या अभिनेत्रींसाठी नक्कीच चॅलेंज ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT