Samantha Ruth Prabhu  file
मनोरंजन

घटस्फोटानंतर ५० कोटी रुपये उकळल्याचा आरोप करणाऱ्याला समंथाचं उत्तर

नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर समंथाला अनेक टीकांना सामोरं जावं लागत आहे.

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला Samantha Ruth Prabhu तिच्या घटस्फोटानंतर अनेक टीकांना सामोरं जावं लागलं, किंबहुना अजूनही जावं लागतंय. घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्या एका ट्विटर युजरला समंथाने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. समंथाने नाग चैतन्यकडून पोटगी म्हणून ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप संबंधित ट्रोलरने केला आहे. २ ऑक्टोबर रोजी समंथा आणि नाग चैतन्य Naga Chaitanya यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर समंथावर अफेअर्स आणि गर्भपातासारखे गंभीर आरोप करण्यात आले.

'घटस्फोटीत समंथाने एका चांगल्या व्यक्तीकडून करमुक्त ५० कोटी रुपये उकळले आहेत', अशा शब्दांत एका ट्विटर युजरने टीका केली. त्यावर समंथाने उत्तर दिलं, 'देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.' समंथा याआधीही ट्रोलर्सबाबत व्यक्त झाली होती. "आमच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहते नाराज झाले हे मी मान्य करते, मात्र त्यांची नाराजी व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी असती तर बरं झालं असतं", असं ती म्हणाली होती.

घटस्फोटानंतर समंथाची पोस्ट-

'माझ्या वैयक्तिक संकटामध्ये तुम्ही जी मला भावनिक सहानुभूती दिली, ते पाहून मी खरोखर भारावून गेली आहे. तुम्ही दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल, काळजीबद्दल आणि खोट्या अफवांपासून माझा बचाव केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. ते म्हणतात, माझं अफेअर होतं, मला मूल नको होतं, मी संधीसाधू आहे आणि आता तर मी गर्भपात केला आहे अशीही अफवा पसरली आहे. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत क्लेशकारक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण मी तुम्हाला वचन देते, या गोष्टींमुळे आणि ते जे काही म्हणतील त्याने मी खचून जाणार नाही,' अशी पोस्ट तिने लिहिली होती.

घटस्फोटानंतर समंथा नुकतीच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटातील आयटम साँगमध्ये झळकली. १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे चार दिवसांत १६ कोटींचा गल्ला जमवला आहे. आयटम साँगमधील समंथाच्या बोल्ड लूकचीही चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

SCROLL FOR NEXT