samantha  Sakal
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: 'सकाळी उठल्यावर माझे डोळे सुजलेले असायचे...' ,आजारातून बाहेर पडणे सामंथासाठी सोपे नव्हते

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी 'शाकुंतलम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

दाक्षिणात्य ते बॉलीवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या 'शाकुंतलम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान सामंथाने आजारपणात तिला झालेल्या वेदनांची कहाणी सांगितली. सामंथाला मायोसिटिस नावाचा आजार आहे ज्यामध्ये संपूर्ण शरीर सुजते. सामंथा म्हणाली की, कलाकारासाठी यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही.

तिच्या आजाराबद्दल आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगताना, सामंथा म्हणाली, 'कधी कधी माझे शरीरावर सूज यायची... मी अचानक लठ्ठ व्हायचे... काही दिवस मी खूप आजारी व्हायचे. माझ्या आजारावर माझे नियंत्रण नव्हते. अभिनेत्याचे डोळे हाव-भाव व्यक्त करण्यासाठी असतात, पण सकाळी उठल्यावर माझे डोळे सुजलेले असायचे.

मी फक्त फॅशनसाठी चष्मा घालत नाही, मला जास्त प्रकाशाचा त्रास होतो. मला मायग्रेन देखील आहे, परंतु त्यावेळी मी चष्मा देखील घालू शकत नव्हते. माझ्या डोळ्यात खूप वेदना होत होत्या आणि 8 महिने ते असेच होते. हे सर्व माझ्यासाठी सोपे नव्हते. कोणत्याही कलाकारासाठी ही सर्वात वाईट गोष्ट असेल.

या आजाराने तिच्या संपूर्ण शरीरावर कसा परिणाम झाला हे सामंथाने सांगितले. अभिनेता म्हणून तुमच्याकडून नेहमीच तंदुरुस्त असणे अपेक्षित असते. तुमच्या चित्रपटांमध्ये परिपूर्णता असली पाहिजे. तुमच्या इंस्टाग्रामवर परिपूर्णता असावी. जे काही कराल त्यात परफेक्शन असले पाहिजे. सुरुवातीला मीही ते मान्य केले. मला नेहमीच चांगले करायचे होते. शेवटी, मी आता त्या स्थितीत आहे जिथे मी या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले आहे.

सामंथाला गेल्या वर्षी तिच्या आजाराची माहिती मिळाली. तिला मायोसिटिस नावाचा दुर्मिळ आजार आहे. यासाठी सामंथाने खूप मोठा ब्रेक घेतला होता. समंथा सध्या तंदुरुस्त आहे आणि तिच्या आगामी 'शाकुंतलम ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सामंथाने मेनका आणि विश्वामित्र यांची मुलगी शाकुंतलमची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 14 एप्रिलला हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT