Samantha Ruth Prabhu esakal
मनोरंजन

घटस्फोटानंतर सामंथाकडून Good News

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री सामंथानं चाहत्यांना एक आनंदीची बातमी दिलीय.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री सामंथानं (Samantha Ruth Prabhu) चाहत्यांना एक आनंदीची बातमी दिलीय. सामंथा आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. घटस्फोटापोटी मिळणारी 200 कोटी रुपयांची पोटगीही सामंथानं नाकारली होती. त्यामुळं तिचे चाहतेही काही दिवस निराश होते. मात्र, सामंथानं आता चाहत्यांसोबत एक चांगली बातमी शेअर केलीय. ही बातमी सामंथाच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित आहे.

सामंथा ही लवकरच आपल्या नवीन चित्रपटाचं चित्रिकरण सुरू करणार आहे. ड्रीम वॉरिअर पिक्चर्स (Dream Warrior Pictures) या प्रोडक्शन हाउस अंतर्गत या चित्रपटाची घोषणा केलीय. हा आयकॉनिक चित्रपट ड्रीम वॉरियर पिक्चर्सची ही 30 वी फिल्म आहे आणि या चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळं सामंथा मुख्य भूमिकेत दिसणार असल्यानं चाहत्यांसाठी ही आनंदची बातमी असणार आहे.

सामंथाला चाहत्यांनीही चित्रपटासाठी All The Best असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. सामंथा आणि नागा चैतन्य या जोडीनं 7 ऑक्टोबर 2017 ला विवाह केला होता. गोव्यामध्ये झालेल्या या विवाहसोहळ्याची चर्चा देशभरात झाली होती. नागार्जुन यानं मुलाच्या लग्नामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. लग्नाला चौथे वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT