Samantha Ruth Prabhu 
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: मुलाच्या घटस्फोटानंतर नागार्जुनला आली सुनेची आठवण? विजयला विचारला प्रश्न!

Vaishali Patil

Nagarjuna asks Vijay Deverakonda about former daughter-in-law Samantha: साऊथ इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा हे सध्या 'कुशी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा हा 1 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दोघांची जोडी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसली. प्रेक्षकांनाही ही जोडी खुप आवडली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी15.25 रुपयांचं कलेक्शन करत बंपर ओपनिंग केली.

सामंथा रुथ प्रभू आणि विजय दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सामंथा ही सध्या ब्रेकवर असली तरी ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उपस्थीत होती. तर काही कार्यक्रमात विजय एकटाच दिसला. आता अलीकडेच विजय देवरकोंडाने बिग बॉस तेलुगुच्या सीझन 7 च्या भव्य प्रीमियरला हजेरी लावली. मात्र फक्त विजयला पाहताच शोचे होस्ट अभिनेता नागार्जुन यांनी विजयला सामंथाबद्दल विचरपुस केली.

याचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. ज्यात विजय शोमध्ये येताच नागार्जुन त्याला समंथा कुठंय असं विचारतो. यावर विजय हसतो आणि त्याला उत्तर देतो. तो म्हणतो की, सामंथा आता अमेरिकेत आहे तिने तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर सामंथा लवकरच आपल्याला जॉईन करेल असंही सांगितलं.

यावेळी विजयने नागार्जुनसमोर सामंथाचं खुप कौतुक केलं. तो तिचा खुप मोठा चाहता आहे. त्याने सामंथाचे सर्व चित्रपट पाहिले असल्याचं सांगितले.

सामंथाने नागा चैतन्यशी 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्न केले होते. ती नागार्जुनची सून होती. सामंथा आणि नागा चैतन्याने एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले मात्र त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT