sk seth and Sambhavna Seth esakal
मनोरंजन

'बाबांचे हात-पाय बांधून ठेवले होते'; संभावनाने रुग्णालयाला पाठवली नोटीस

संभावनाच्या बाबांचं कोरोनाने झालं निधन

स्वाती वेमूल

अभिनेत्री संभावना सेठने Sambhavna Seth दिल्लीतील एका रुग्णालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ज्या रुग्णालयात तिच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं, त्याच रुग्णालयाला तिने ही नोटीस पाठवली आहे. संभावनाचे वडील एस.के. सेठ हे दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात दाखल होते. ८ मे रोजी त्यांचं कोरोनाने निधन झालं. सेवांमध्ये कमतरता आणि वैद्यकीय दुर्लक्ष केल्याचा आरोप तिने या नोटिशीत केला आहे. (Sambhavna Seth sends legal notice to Delhi hospital where her father passed away)

याविषयी 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत संभावना म्हणाली, 'सेवांमध्ये कमतरता, वैद्यकीय दुर्लक्ष, योग्य काळजी घेतली नाही आणि लक्ष दिलं नाही यांमुळे मी रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे. माझ्या बाबांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चार दिवसांनी ३० एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या आणि काही दिवसांत ते ठीक होतील असं म्हणाले. त्यामुळे आमची थोडी चिंता कमी झाली होती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा माझा भाऊ रुग्णालयात गेला, तेव्हा बाबांचे हात बांधले होते. त्याने ताबडतोब त्यांची सुटका केली आणि रुग्णालयाला जाब विचारला. ते सारखं सलाइन काढून टाकत होते, असं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलं. ७ मे रोजी माझ्या भावाने सांगितलं की त्यांचं सॅच्युरेशन ९० ते ९५ दरम्यान असतानाही बाबांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रुग्णालयात गेले, तेव्हा त्यांचे दोन्ही हात आणि पाय बेडला बांधून ठेवले होते. ऑक्सिजन सप्लाय त्यांनी काढून टाकू नये म्हणून बांधल्याचं रुग्णालयाने सांगितलं. मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी तिथे कोणीच उपस्थित नव्हतं. त्यांची ती अवस्था मला बघवत नव्हती. रुग्णालयाचा व्हिडीओ काढला असता त्यांनी मला ते डिलिट करायला भाग पाडलं. त्यानंतर काही वेळाने त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आला आणि त्यांचं निधन झालं.'

संभावनाच्या या नोटिशीवर अद्याप रुग्णालयाकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT