alia bhatt instagram
मनोरंजन

'सेम टू सेम' आलियाची कॉपी!, फोटो एकदा पाहाच...

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांसारखे हुबेहुब दिसणारे चेहरे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट ही नेहमी चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आलियाचे मोठा चाहता वर्ग आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांसारखे हुबेहुब दिसणारे चेहरे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर नुकताच अभिनेत्री कियारा अडवानीने तिच्या सारख्या दिसणाऱ्या मुलीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तर सध्या आलिया सारख्या दिसणाऱ्या मुलीचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आलिया सारख्या दिसणाऱ्या त्या मुलीचे नाव सेलेस्टी बैरागे अस आहे. ती आसमची असून ती एक इंस्टाग्राम इन्फ्युएन्सर आहे. तिचे जवळपास ३५.४ हजार फॉलवर आहेत. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "सेम आलियासारखी स्माईल" एकाने "आलिया भट्ट आणि ही जवळपास सारख्याच दिसतात," तर दुसऱ्याने "आलिया भट्ट ही तू आहेस?" अश्या कमेंट केल्या आहेत.

आता लवकरच आलिया रणबीर कपूरसोबत डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होत आहे. लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना आलियाची आई सोनी राजदान यांनी बॉलीवूडलाइफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं, “बरं, या गोष्टीला अजून खूप वेळ आहे. हे भविष्यात कधीतरी घडू शकत. आता, ते कधी होईल, मला माहित नाही. कदाचित, त्यासाठी तुम्हाला आलियाच्या एजंटला कॉल करावा लागेल,पण हे कदाचित तिच्या एजंटलाही माहित नसेल.” आलियाकडे ब्रह्मास्त्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी, गंगूबाई काठियावाडी, डार्लिंग्स, आरआरआर आणि जी ले जरा यासह अनेक प्रोजेक्टस आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT