Sameer Khakhar death Esakal
मनोरंजन

Sameer Khakhar Death: समीर खाखर कसे बनले 'नुक्कडचे खोपडी'? मराठा मंदीरच्या गेटवरच जुळून आला होता योग..वाचा किस्सा

'नुक्कड' मालिकेमुळे घराघऱात ओळखले जाणारे अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे.

प्रणाली मोरे

Sameer Khakhar Death: 'नुक्कड' मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झालेले समीर खाखर यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार समीर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. श्वसनाच्या विकारासोबतच वयोपरत्वे येणाऱ्या इतरही काही व्याधींनी ते त्रस्त होते. अचानक त्यांना श्वसानाचा त्रास जाणवू लागल्यानं इस्पितळात दाखल करण्यात आलं,आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

समीर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे असंख्य चाहते त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. लोकांना त्यांच्याविषयी अधिक किस्से आता जाणून घ्यायचे आहेत,त्यांच्या आठवणी त्यांना जाणून घ्यायच्या आहेत.

तेव्हा चला समीर यांना 'नुक्कड' मालिका कशी मिळाली यासंबंधित एक किस्सा जाणून घेऊया. (Sameer Khakhar death casting story as khopdi in nukkad )

समीर खाखर कसे बनले नुक्कडचे खोपडी?

समीर खाखर यांच्या टी.व्ही करिअरची सुरुवात 'ये जो हुई जिंदगी' मधनं झाली. याच्या एका एपिसोडमध्ये त्यांनी डिटेक्टिव्हची व्यक्तिरेखा साकारली होती. अर्थात लोकांना अजूनही असं वाटतं की समीर खाखर यांच्या करिअरची सुरुवात 'नुक्कड' मालिकेपासून झाली होती.

'नुक्कड' मध्ये समीर खाखर यांनी जी व्यक्तिरेखा साकारली होती,त्याला लोकांनी खूप पसंत केलं होतं. नुक्कड मध्ये समीर खाखर यांची निवड कशी झाली याच्या मागचा किस्सा खूपच मजेदार आहे.

हे बोलणं चुकीचं ठरणार नाही की अमजद खान यांच्या सोबत' फुर फुर करके आई चिडिया' नावाचं नाटक समीर खाखर करत होते,तेव्हा याच नाटकामुळे त्यांना 'नुक्कड' मालिकेतील 'खोपडी' ही व्यक्तिरेखा ऑफर झाली होती.

'फुर फुर.'.मध्ये समीरच्या एका मित्रानं त्यांना सांगितलं होतं की,'एक मोठा शो येतोय आणि त्याच्या मेकर्सना तुला भेटायचंय. तु लगेच मराठा मंदीरला ये,जिथे दिग्दर्शक सईद मिर्झा यांच्याशी मी तुझी भेट करून देईन'.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

दुसऱ्या दिवशी समीर मराठा मंदीरला पोहोचले पण खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही त्यांचा मित्र तिथे आला नाही. त्यानंतर समीर यांनी जवळच्याच दुकानातून सिगरेट घेतली आणि ओढू लागले. तेवढ्याच नेमकं तिथे कुंदन शाह आले,ज्यांच्यासोबत एक दुसरा एक माणूसही होता.

तेव्हा कुंदन यांनी समीर यांना विचारले की,'इथे काय करतोयस?' समीरनं सगळं सविस्तर सांगितलं. समीरचं सगळं ऐकून घेतल्यानंतर कुंदन शाह हसले आणि म्हणाले की,'त्यांच्यासोबत हा जो माणूस आहे तो अजीज मिर्झा आहे. आणि ते सईद मिर्झाचे मोठे भाऊ आहेत'.

मराठा मंदीर जवळच मिर्झा यांचे घर होते,जिथे कुंदन समीरना घेऊन गेले. सईद मिर्झा यांच्याशी भेट झाल्यानंतर समीर यांची छोटीशी टेस्ट झाली आणि त्यानंतर त्यांना 'नुक्कड' मध्ये 'खोपडी' ही व्यक्तिरेखा मिळाली.

या किश्श्यात आणखी एक मजेदार गोष्ट आहे की सुरुवातील 'खोपडी' ही व्यक्तिरेखा केवळ तीन एपिसोड पुरती मर्यादित होती पण समीर यांचा अभिनय पाहून सईद मिर्झा यांनी पूर्ण शो साठी ती व्यक्तिरेखा कायम केली.

१९९३ मध्ये 'नुक्कड' चा सीक्वेल देखील आला होता..पण जुन्या 'नुक्कड' सारखी ती मालिका लोकांचे मन जिंकण्यात अयशस्वी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Cryptic Post: खरा पराभव तेव्हाच होतो, जेव्हा...; विराटच्या पोस्टने सारे चक्रावले, गौतम गंभीरच्या 'त्या' सूचक इशाऱ्याला दिले उत्तर

Dhanteras 2025 Wishes In Marathi: धन धान्याची व्हावी घरीदारी रास..! धनत्रयोदशीनिमित्त नातेवाईक अन् मित्रमंडळींना द्या खास मराठीतून शुभेच्छा

'यंदा गोविंदबागेत दिवाळी साजरी न करण्याचा पवार कुटुंबीयांचा निर्णय'; काय आहे कारण? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आमच्या काकी...'

Karad politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कऱ्हाड दक्षिण ‘लक्ष्य’; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक; लवकरच शिवसेनेत प्रवेशाची शक्यता

Gold Rate Today : सोन्याची पुन्हा भरारी, चांदीच्या भावातही वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT