sameer paranjpe eliminate from sur nava dhyas nava show emotional post viral  eSakal
मनोरंजन

Sameer Paranjpe: "हा अभिनेता आहे ह्याला उगाच आणलंय.." शोमधून बाहेर पडल्यावर समीर परांजपेची पोस्ट चर्चेत

सूर नवा ध्यास नवा शोमधून एक्झिट झाल्यावर समीर परांजपेची खास पोस्ट चर्चेत

Devendra Jadhav

Sameer Paranjpe Sur Nava Dhyas Nava: सूर नवा ध्यास नवा शोमधून अभिनेता - गायक समीर परांजपेची एक्झिट झालीय. समीर परांजपे शोमधून एलिमिनेट झालाय. त्यानंतर समीरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहीलीय जी चर्चेत आहे.

समीर लिहीतो, "सूर नवा चे आमचे लाडके परीक्षक अवधुत गुप्ते.. काय बोलू मी दादा..नारायणा नंतरची मिठी कायम लक्षात राहील..तुमची शिट्टी आणि पार बुक्का पाडलास मित्रा हे ऐकलं की काय आनंद होतो सांगू..महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून आमचं मन तूम्ही जिंकल आहेच.. परीक्षक म्हणून ही तुम्ही आम्हा सगळ्यांचे लाडके आहात पण इथे शूटींग सुरू होण्याआधी ज्या आत्मीयतेने तूम्ही सगळ्या स्पर्धकांची चौकशी करायचात ,तब्येत वैगरे ठीक आहे ना विचारायचात, बाहेरगावाहून आलेल्या आणि स्पर्धेसाठी इकडे मुंबईत राहत असलेल्या स्पर्धकांना राहता तिथे काही अडचण नाही ना, सगळं नीट वेळच्या वेळी मिळतंय ना काहीही अडचण असेल तरी डायरेक्ट मला सांगा म्हणायचात..

समीर पुढे लिहीतो, "तेंव्हा मला कळलं कुठल्याही गाण्यातला भाव तुम्ही इतक्या ताकदीने पेश कसं करू शकता.. तुमचं "माणूसपण" तुमच्या प्रत्येक गाण्यात उतरतं बहुदा.
परीक्षक म्हणून तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स मधून तर शिकलोच पण माणूस म्हणून ही खूप काही शिकवलंत..खूप प्रेम.. आणि माझा वनवास संपवलात या साठी कायम ऋणात राहीन."

समीर पुढे लिहीतो, "महेश काळे दादा गाण्यानंतरच्या तुमच्या सूचना कमेंट्स ह्या लाख मोलाच्या असतातच. त्याचे आम्ही स्पर्धकच नाही तर प्रेक्षक ही फॅन आहेत .पण कला ही साधना आहे आणि साधनेची शुचिर्भूतता कशी राखावी कलेशी एकनिष्ठ कसं राहावं, मेहनतीतून काय साधायचं आणि काय भेदायचं शिकवलंत.. तुम्ही गाता तेंव्हा अभिनेता गातोय असं वाटत नाही गाण्यावर जरूर मेहनत घ्या रियाजाची शिदोरी वाढवा मी तुम्हाला मदत करेन हे तुम्ही म्हणालात हे मला कायम आठवण करून देत राहील की मला गाणं करायचं आहे मेहनत घ्यायची आहे.तुमचे ही खूप आभार."

समीर शेवटी लिहीतो, "आणि सगळ्यात शेवटी रसिकप्रेक्षक, खरंतर मनात खूप भीती होती प्रेक्षक गायक म्हणून स्वीकारतील का? अरे हा अभिनेता आहे ह्याला उगाच आणलंय स्पर्धेत असं तर म्हणणार नाहीत ना.. पण तुम्ही प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम, शुभेच्छा दिल्या.. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद दिलीत आणि गायक म्हणूनही मला स्वीकारलं त्यासाठी तुमचे ही आभार. असंच प्रेम आणि आशीर्वाद देत रहा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT