Biopic on Sameer Wankhede
Biopic on Sameer Wankhede Esakal
मनोरंजन

शाहरुखच्या लाडक्या लेकाला बेड्या ठोकणाऱ्या Sameer Wankhede यांच्यावर येणार बायोपिक..

सकाळ डिजिटल टीम

Biopic on Sameer Wankhede: सध्या मनोरंजन विश्वात प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक तयार करण्याकडे जास्तच भर दिला जातो. कारण प्रेक्षकांना आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयूष्याला रुपेरी पडद्यावर पाहणे जास्त आवडत असल्याचं बोललं जातं.

आताप्रर्यंत बॉलिवुडमध्ये अनेक व्यक्तीवर बायोपिक तयार करण्यात आली आहे. त्यातच आता इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या महान राजकीय नेत्यावरही बायोपिक तयार होत आहेत.

आता त्यातच आणखी एका व्यक्तीवर बायोपिक तयार करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतिच करण्यात आली आहे.

हा व्यक्ती आहे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे.

समीर वानखेडे यांच्यावर आता बायोपिक बनणार असल्याचे वृत्त आहे. वर्षअखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारी सुरु होणार आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक 'मैं अटल हूं'च्या निर्मात्यांपैकी एक असलेला झीशान अहमद मुंबईत NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या बायोपिकची निर्मिती करणार आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या लेखन टीममध्ये टीव्ही पत्रकार निधी राजदान यांचाही सामावेश असेल. समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या संवादावर हा चित्रपट अवलंबुन असेल असे असल्याचे सांगण्यात येत आहे.

समीर वानखेडे यांचा बायोपिक लिहिणाऱ्या प्रीतम झा यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात वानखेडे यांच्या आयुष्याशी संबंधित ते पैलू सांगण्यात येणार आहेत, ज्यांबद्दल अजूनही लोकांना माहिती नाही.

चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या कास्टिंगचे काम सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. समीरच्या भूमिकेसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांशी बोलणी सुरू असून, चित्रपटाचे स्क्रिप्टिंग पूर्ण झाल्यानंतर कोणाला फायनल केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT