Sameer Wankhede Esakal
मनोरंजन

Sameer Wankhede Case Update: वानखेडेंनी घेतली 50 लाखांची लाच? शाहरुखच्या मॅनेजरने दिली रक्कम...नवा खुलासा समोर

आर्यनला सोडवण्यासाठी शाहरुखच्या मॅनेजरने दिली होती 50 लाखांची लाच? नवी माहिती आली समोर

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या आर्यन खान ड्रग्जप्रकरणी सीबीआयने एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची काल (शनिवारी) पाच तास चौकशी केली आहे. या चौकशीच्या दरम्यान संपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे समीर वानखेडे यांची आज (रविवारी) देखील पुन्हा चौकशी सुरू आहे.

समीर वानखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2021 मध्ये कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. केलेल्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. शाहरुख खानच्या मुलाला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी आता शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.

आर्यनला या संपूर्ण प्रकरणातून वाचवण्यासाठी वानखेडेंच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या पथकाने खान कुटुंबीयांकडे 25 कोटींची लाच मागून 18 कोटी रुपयांवर डील करण्याची तयारी दर्शवली होती, असं बोललं जात आहे. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिच्यासोबत चर्चा करून ही डील निश्चित करण्यात आल्याची माहीती आहे. तिने डाऊन पेमेंट म्हणून 50 लाख रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तर पूजाने स्वत:हे पैसे दिले नाहीत तर बॉलिवूडशी जवळीक असणाऱ्या वांद्रेतील एका राजकारण्याने तिच्यासाठी या रकमेची व्यवस्था केल्याचं म्हंटलं जात आहे. वानखेडे यांच्या विरुद्धच्या आरोपप्रकरणी आधी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. सीबीआयने काल (शनिवारी)वानखेडेंची चौकशी केली. संपुर्ण माहीती न मिळाल्यामुळे वानखेडे यांची आजही चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT