Sameer Wankhede esakal
मनोरंजन

Sameer Wankhede : मुलाला सोडवा म्हणून शाहरुख खान करायचा विनवणी; याचिकेत धक्कादायक माहिती

संतोष कानडे

मुंबईः आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. आज या प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आलेला आहे. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेमधून ही माहिती समोर येतेय.

समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यामध्ये अनेकदा संभाषण झाल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेतून पुढे आली आहे. मुलाला सोडवण्यासाठी शाहरुखने विनंती केल्याचं याचिकेत नमूद करण्यात आल्याची धक्कायक माहिती पुढे येतेय. समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान यांचं व्हॉट्सअप चॅट कोर्टासमोर आलेलं आहे.

समीर वानखेडे यांच्या याचिकेमधून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्या घरावर देखील छापेमारी देखील केली होती. या प्रकरणात वानखेडे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच प्रकरणात सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश होता.

सीबीआयच्या एफआयआरमध्ये काय म्हटलंय?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं.

आता समीर वानखेडे यानी थेटपणे शाहरुख खानने विनंती केल्याचं याचिकेत नमूद केल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT