Sameera Reddy On Body Shaming  esakal
मनोरंजन

Sameera Reddy On Body Shaming : 'बायकांना त्यांच्या वजनावरुन बोलणं हा तर पुरुषांचा जन्मसिद्ध अधिकार'! समीराचा संताप

समीरा ही तिच्या परखड वक्तव्यांविषयी बोलणारी सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाते.

युगंधर ताजणे

Sameera Reddy On Body Shaming : बॉलीवूडमध्ये फिटनेस फ्रीक म्हणून ज्या अभिनेत्रींचे नाव घ्यावे लागते त्यात समीरा नेहमीच आघाडीवर असते. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही तिनं स्वताला खूपच फिट ठेवले आहे. तिचे इंस्टावरील फोटो, व्हिडिओ चाहत्यांना खूप काही सांगून जाणारे असतात.

समीरा ही तिच्या परखड वक्तव्यांविषयी बोलणारी सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाते. यापूर्वी देखील तिनं तिच्या वक्तव्यांनी वाद निर्माण केला आहे. आता तिनं महिलांचे वजन आणि त्यामुळे त्यांना घरातून कोणत्या अपमानाला सामोरं जावं लागतं याविषयी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या एका वृत्तामध्ये समीरानं यावेळी महिलांचे प्रश्न, त्यांची मानसिकता आणि पुरुषी स्वभाव यावर मत व्यक्त केले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

समीरा म्हणते, प्रत्येकाला महिलांविषयी बोलायचे आहे. त्यांच्यावर टिप्पणी करायची आहे. महिलांच्या दिसण्यावर, त्यांच्या वजनावर बोलणे हा पुरुषांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. असे त्यांना वाटते. ही मानसिकता आता बदलण्याची गरज आहे. आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्यांतून जात असतो. तेव्हा त्या परिस्थितीचा संयमानं विचार व्हायला हवा. कित्येक घरांमध्ये अजूनही वजन वाढलेल्या महिलांविषयी काय विचार होतो, त्यांना कशाप्रकारे बोलले जाते हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

मुलांना जन्म देणं हे चमत्कारापेक्षा कमी नाही...

समीरानं त्या मुलाखतीमध्ये परखडपणे वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले आहे. ती म्हणते की, वयोमानानुसार स्त्रियांच्या शरीरात बदल होतो. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरही होतो. याचा कुणीही विचार करत नाही. त्यावरुन त्यांना बोलण्यास मात्र बरेचजण अग्रेसर असतात. एखादी महिला जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळी तिची शाररिक आणि मानसिक अवस्था याविषयी किती जण गांभीर्यानं विचार करतात?

बाळाला जन्म देणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. तिला पुन्हा मानसिक आणि शाररिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. तिला तो वेळ आपण देतो का, त्या दरम्यान तिला समजून घेतो का हा मुख्य प्रश्न आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर ते कसे असेल किंवा कसे दिसेल याचा कोणताही फॉर्म्युला नाही. पण लोकं एखादी महिला जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या मानसिकतेचा विचार करत नाही. हे समीरानं स्पष्टपणे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT