Sana Khan drinks 24 carat gold tea Google
मनोरंजन

२४ कॅरेटचा Gold Tea पिणाऱ्या सना खानसोबतच होतेय चहाच्या किंमतीची चर्चा

दुबईत बुर्ज खलिफा या जगातील सगळ्यात उंच इमारतीतील रेस्तरॉंमध्ये सना हा चहा घेतानाचा फोटो तुफान व्हायरल होतोय.

प्रणाली मोरे

एकेकाळी हॉट,ग्लॅममरस अभिनेत्री म्हणून वावरणाऱ्या सनानं(Sana Khan) अचानक ग्लॅमर इंडस्ट्रीला राम राम ठोकला,अन् तेव्हापासनं आजतागायत तिनं हिजाबचं काटेकोरपणे पालन केलं. सनाच्या या निर्णयांना अनेकांना धक्का बसला होता. पण मग तिनं गुजरातचे उद्योगपती मुफ्ती अनस सय्यद सोबत लग्न केल्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण असं असलं तरी सना नेहमीच चर्चेत असते हे देखील नाकारता येणार नाही. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आपल्या डे टू डे लाईफच्या काही इंट्रेस्टिंग स्टोरी ती शेअर करताना नेहमी दिसत असते. सध्या तिचा एक फोटो मोठा ट्रेंडिगमध्ये आहे. या फोटोत ती दुबईत(Dubai) जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा मधील रेस्तरॉंमध्ये चक्क गोल्ड टी(Gold Tea) पिताना दिसत आहे.

दुबईतील बुर्ज खलिफा(Burj Khalifa)इमारतीत अनेक मोठ-मोठे हॉटेल्स आहेत. याच इमारतीतील अॅटमॉस्फिअर रेस्तरॉंमध्ये ती सोन्याचा वर्ख चढवेलला चहा पिताना दिसत आहे. सना खाननं हा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत म्हटलं आहे,''चुकीच्या पद्धतीनं पैसा कमवून आनंद उपभोगणाऱ्यांशी कधीच स्वतःच्या आयुष्याची तुलना करु नका. या जगात कदाचित तुम्हाला ते यशस्वी वाटत असतील पण देवाच्या(अल्लाहच्या)vसमोर मात्र त्यांची किंमत शून्य असते,आणि हेच अखेर महत्त्वाचं ठरतं''.

दुबईत एकसे एक हॉटेल्स आहेत. त्यात जगातील सर्वात उंच इमारत म्हणून मान मिळालेल्या बुर्ज खलिफामधील रेस्तरॉंची बातच काही और. तेथीलच अॅटमॉस्फिअर रेस्तरॉमंध्ये सना सोन्याचा वर्ख चढवलेला चहा पिताना दिसत आहे. जगात सर्वात उंचावर असलेल्या रेस्तरॉंपैकी एका रेस्तरॉंत सना सोन्याचा चहा पित बसल्यामुळे तिची सर्वचजण चर्चा करताना दिसत आहेत. इथलं जेवणं सोडा,चहा देखील हजारोच्या किंमतीत विकला जातो बरं का. सना ज्या गोल्ड प्लेटेड चहाची चव घेतेय त्याची किंमत दुबईच्या दिराम या चलनात १६० दिराम इतकी आहे. म्हणजे आपल्या भारतीय रुपयात जवळपास ३३०० च्या पुढेच. या सोन्याच्या चहाची किंमत ऐकून नेटकरी मात्र आश्चर्यचकित झालेयत.

सनाचा नवरा गुजरातमधील मोठा व्यापारी असण्यासोबतच इस्लामिक विद्वान देखील आहे. त्याच्या कुटुंबाचा हिऱ्याचा व्यवसाय आहे. २१ नोव्हेंबर २०२० ला सनासोबत लग्न केल्यानंतर तो चर्चेत आला. सना नेहमी आपल्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. मध्यंतरी हिजाब प्रकरणामुळेही सना चर्चेत आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT