Tribute to Satish Kaushik:  Esakal
मनोरंजन

सँड कलाकार सुदर्शन पटनायक यांनी Satish Kaushik यांना वाहिली अखेरची श्रद्धांजली.. Photo viral

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सतीश कौशिक यांनी गुरुवारी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करत बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रसिद्ध सँड कलाकार सुदर्शन पटनायक यांनीही त्यांच्या शैलीत सतीश कौशिक अखेरची श्रद्धांजली वाहिली आहे. सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर सतीश कौशिक यांची सँड आर्ट तयार केली आहे. त्यांनी सतीश कौशिक यांचा चेहरा या सँड आर्टमध्ये साकारला आहे.

ज्यावर त्यांनी लिहिले आहे की, "सतीश कौशिक यांना श्रद्धांजली" सुदर्शन पटनायक यांनी सतीश कौशिक यांच्या या सँड आर्टचा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, “अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक सतीश कौशिकजी यांच्या आकस्मिक निधनाने खूप दुख झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना. शांतता. पुरी बीचवर माझा सँडर्ट" सुदर्शन पटनायक यांनी सतीश कौशिक यांच्या या सँड आर्टचा व्हिडिओही ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याच्या पार्श्वभूमीवर सतीश कौशिक यांचा आवाज ऐकू येतो.

सतीश कौशिक यांच्यावर ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पुतण्या निशांत कौशिक यांनी त्यांना अग्नीडाग दिला.

तर अनुपम खेर, जावेद अख्तर, फरहान अख्तर, सलमान खान, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, संजय कपूर, राज बब्बर, अनूप सोनी, अनु मलिक, अलका याज्ञिक, शिल्पा शेट्टी, तन्वी आझमी यांच्यासह अनेक स्टार्स सतीश कौशिक यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते. 11 मार्च रोजी सतीश कौशिक यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT