sandeep kulkarni as mahatma jyotiba phule in satyashodhak marathi movie SAKAL
मनोरंजन

Satyashodhak: तिमिरातुन तेजाकडे! संदीप कुलकर्णींचा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भुमिकेतला पहिला लुक समोर

संदीप कुलकर्णी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भुमिकेत शोभुन दिसत आहेत

Devendra Jadhav

गेल्या अनेक दिवसांपासुन संदीप कुलकर्णींची भुमिका असलेल्या सत्यशोधक सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गेले अनेक दिवसांपासुन महात्मा फुलेंची भुमिका साकारणारे संदीप कुलकर्णी या लुकमध्ये कसे दिसतात याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर संदीप कुलकर्णींचा महात्मा फुलेंच्या भुमिकेतला पहिला लुक समोर आलाय.

(sandeep kulkarni as mahatma jyotiba phule in satyashodhak marathi movie)

संदीप कुलकर्णी हुबेहुब महात्मा फुले

नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या पोस्टरवर अभिनेते संदीप कुलकर्णी झळकले आहेत. महात्मा ज्योतिरावांसारखे हुबेहुब दिसणाऱ्या संदीप कुलकर्णी यांच्या लूकची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत होत आहे.

वेशभूषा आणि रंगभूषा अगदी योग्य जमून आल्याने खरेच महात्मा ज्योतिराव फुले समोर आहेत असा भास होतोय. त्यामुळे फुलेंच्या भुमिकेसाठी अभिनेत्याची योग्य निवड आणि लूकचा संपूर्ण अभ्यास करूनच ही भूमिका साकारली गेल्याचे स्पष्ट होत आहे.

सत्यशोधक सिनेमाला रिलीजआधीच अनेक पुरस्कार

‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या म‌. ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच साकारणार आहे. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील.

या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. इंग्लंडमधील पेन्झान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बायोग्राफीकल फिचर फिल्म या पुरस्काराने तर, जर्मनीत होहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान या चित्रपटाला मिळाला.

सत्यशोधक सिनेमाची रिलीज डेट बदलली, आता या दिवशी येणार सिनेमा भेटीला

समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक सिनेमा आधी १० नोव्हेंबरला रिलीज होणार होता. आता सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.

रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT