sangeet devbabhali marathi natak last show at Shanmukhananda hall sion  Esakal
मनोरंजन

Sangeet Devbabhali: कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर 'संगीत देवबाभळी घेणार निरोप', सहा वर्षांच्या प्रयोगांच्या वारीला पूर्णविराम

सहा वर्ष मराठी रंगभूमी गाजवणारं नाटक संगीत देवबाभळी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे

Devendra Jadhav

मराठी रंगभूमीवर कायमच रसिकांना दर्जेदार नाटकं बघायला मिळाली आहेत. अगदी संगीत स्वयंवर पासून ते नटसम्राट पर्यंत असंख्य दर्जेदार नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर साकार झाले.

सध्या मराठी रंगभुमीवर दादा एक गुड न्यूज आहे, संज्याछाया, वाडा चिरेबंदी, व्हॅक्यून क्लीनर अशा अनेक नाटकांचे प्रयोग सुरु आहेत. यातील एक महत्वाचं नाटक म्हणजे संगीत देवबाभळी. संगीत देवबाभळीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. पण आता हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

(sangeet devbabhali marathi natak last show)

या नाट्यगृहात रंगणार शेवटचा प्रयोग

२२ डिसेंबर २०१७ यादिवशी 'भद्रकाली' प्रॉडक्शन' च्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि रसिकांच्या प्रेमळ प्रतिसादाने भारावलेली ही 'संगीत देवबाभळी' ची नाट्य दिंडी विसावणार आहे. बुधवारी, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.

सहा वर्षांचा प्रवास थांबणार

संगीत देवबाभळी नाटकाचा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि रसिकांच्या साथीने तो यशस्वीही झाला. मध्ये कोरोना सारखं भयाण संकट येऊन गेलं. तरीही प्रेक्षकांनी संगीत देवबाभळी नाटकावर प्रेम केलं.

संगीत देवबाभळीवर पुरस्कारांचा वर्षाव

संगीत देवबाभळी या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही 'देवबाभळी' आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.

अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी 'संगीत देवबाभळी' हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे. तेव्हा कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला या विठू सावळ्या नाट्यकृती पाहण्यात प्रेक्षकांनी मग्न व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT