Sangeet samrat new show esakal news
Sangeet samrat new show esakal news 
मनोरंजन

क्रांती रेडकर आणि आदर्श शिंदे करणार संगीत सम्राटांचे परीक्षण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : संगीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. संगीतावर भरभरून प्रेम करणाऱ्या  मराठी प्रेक्षकांसाठी झी युवा ही वाहिनी "संगीत सम्राट हा एक अनोखा  संगीतमय कार्यक्रम  घेऊन आली आहे . महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक , वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे असे अनेक कलावंत संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे  मराठी रसिकांसमोर त्यांची कला सादर करणार आहेत. महाराष्ट्राचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे सूर ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे कलाकारांचे  परीक्षण करणार  आहेत  तर मराठी चित्रपट सृष्टीतील  आघाडीची नायिका क्रांती रेडकर वानखडे कलाकारांच्या परफॉर्मन्स किती मनोरंजनात्मक आहेत याचे  परीक्षण करणार आहेत .

गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी निवेदनाची भूमिका सांभाळली आहे . प्रेक्षकांना हा कार्यक्रम २६ जून पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

झी युवा आणि झी टॉकीज चे व्यवसाय प्रमुख 'बवेश जानवलेकर' यांनी “संगीत सम्राट” या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले की, "मराठी प्रेक्षकांची संगीत क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन फार कमी कार्यक्रम आजवर छोट्या पडद्यावर आले आहेत . छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना तो आनंद आजवर अनुभवायला मिळाला नाही. सर्वसामान्यांमध्ये दडलेला आणि संगीताशी नाळ जोडलेला कलाकार समाजासमोर यावा, त्याचप्रमाणे कलाकारांसोबत चांगला श्रोता घडावा या हेतूने,  झी युवाने गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. महाराष्ट्रातील ६ शहरांमध्ये घडलेल्या निवडचाचणी मध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली . मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नाशिक  या शहरांमधून कलाकार शोधून काढले .  

"संगीत सम्राट "या मालिकेच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना अश्या अनेक कलाकारांना भेटायला मिळणार आहे ज्यांच्या संगीतमय आयुष्याचा  प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरू शकेल . यात असे कलावंत आहेत जे अगदी हलाखीच्या परिस्थितीतही आपली संगीत साधना जोपासली आहे. तर काही स्पर्धकांच्या जवळच्या लोकांनी कलेच्या यशासाठी केलेले त्याग थक्क करणारे आहेत. आपल्याला सर्वज्ञात नसलेली नानाविध वाद्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळखीची होतील.  आधुनिक आणि पारंपरिक संगीताचा अनोखा  मेळ या कार्यक्रमामुळे रसिक प्रेक्षकांना पाहण्याची पर्वणी झी युवाच्या "संगीत सम्राट" या कार्यक्रमामुळे  मिळणार आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT