sanjana sanghi
sanjana sanghi 
मनोरंजन

'दिल बेचारा'साठी अभिनेत्री संजना सांघीने शिकली बंगाली भाषा...

संतोष भिंगार्डे

मुंबई : 'दिल बेचारा' हा अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट. तर अभिनेत्री संजना सांघी हिचा पहिलाच चित्रपट. संजनाला हा चित्रपट मिळाला खरा. पण ती दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी काही सुरुवातीला तिला गोष्टी सांगितल्या त्याबद्दल ती कमालीची अस्वस्थ होती. 

ती सांगते, की मुकेश छाबरा यांनी मला सुरुवातीलाच सांगितले की तुझे उच्चार आणि शब्द बंगाली संस्कृतीसारखे येणे आवश्यक आहे. मला बंगाली फ्लेवर या भूमिकेसाठी आवश्यक आहे आणि तुला ते करणे गरजेचे आहे. त्यांचे हे कठोर बोलणे माझ्या मनाला खटकले. मी काहीशी नाराज झाले पण सुरुवातीला काही बाबी कठीण वाटत असल्या तरी हळूहळू त्या सोप्या होत जातात असा विचार मनात आला आणि मी ही भूमिका केली.

दिल्लीत बंगाली शब्दकोशाच्या शिक्षकाकडून बंगाली भाषेचे प्रशिक्षण घेतले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील सुश्मिता सूर यांच्याकडून गंभीर बोलण्याचे प्रशिक्षण घेतले. मी नवी दिल्लीची असल्याने बंगाली मुलीची भूमिका साकारणे अवघड होते. सहा-सात महिने अथक परिश्रम घेतल्यानंतर आता मी बंगाली बोलू शकते आणि समजूही शकते.
---
(संपादन : ऋषिराज तायडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT