Sanjay Dutt and Arshad Warsi tease 'exciting' new film together; fans ask 'is it Munna Bhai MBBBS 3?' sakal
मनोरंजन

Sanjay Dutt Arshad Warsi: मुन्नाभाई परत येतोय? संजय दत्त-अर्शद वारसी यंदा तुरुंगात उडवणार धमाल..

संजय दत्तने केली मोठी.. 2023 येणार नवीन चित्रपट..

नीलेश अडसूळ

Sanjay Dutt Arshad Warsi new movie : आज प्रजासत्ताक दिनी अनेक चित्रपट आणि नवनवीन घोषणा होत असतानाच अभिनेता संजय दत्त त्याने एक मोठी घोषणा केली आहे. संजय दत्त-अर्शद वारसी ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. लवकरच त्यांचा चित्रपट येत असून आम्ही त्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त उत्सुक आणि आतुर आहोत =असे संजय दत्तने केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे. ही पोस्ट पासून मुन्नाभाई चित्रपटाचा तिसरा भाग येतोय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

(Sanjay Dutt and Arshad Warsi tease 'exciting' new film together; fans ask 'is it Munna Bhai MBBBS 3?')

संजय दत्त आणि अर्शद वारसी या जोडीने आजवर प्रेक्षकांना प्रचंड हसवले. गुंडगिरी, प्रेम आणि समाजाप्रती आस्था अशा तीन विविध बाजूंचा संगमी साधणारा संजय दत्त (sanjay dutt)चा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (Munna Bhai MBBS) हा चित्रपट 2003 साली प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक या जोडीची केमिस्ट्री पाहून अवाक झाले.

हाच मुन्नाभाई पुढे प्रोफेसर होऊन गांधीगिरी शिकवायला आला. अर्थात त्याच्या सोबत सर्किट होताच. 2006 मध्ये आलेल्या 'लगे रहो मुन्नाभाई'ने ही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. बॉक्सऑफिसवर ही जोडी कायमच हीट ठरली आहे. त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते बरेच उत्सुक आहेत.

हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

अखेर ती प्रतीक्षा संपली आहे. दोघेही एकत्र आले असून आज त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. हा चित्रपट कोणता आहे, हे अद्याप कळले नसले तरी यंदा यांची भाईगिरी थेट तुरुंगात चालणार आहे.

परंतु हा चित्रपट म्हणजे मुन्नाभाईचा तिसरा भाग असेल असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. 'तुम्ही जितकी प्रतीक्षा केली त्याहून अधिक आम्ही आतुर होतो. अखेर ती प्रतीक्षा संपली आहे. माझा भाऊ अर्शद वारसी आणि मी एक उत्कंठा वर्धक चित्रपट घेऊन येत आहोत.' अशी पोस्ट संजय दत्त याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT